Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातारच्या 10 औद्योगिक ग्राहकांची वीजचोरी उघडकीस

14 लाख 47 हजार युनिटची चोरी; 3 कोटी 33 लाखांचा दंडसातारा / प्रतिनिधी : वीजेच्या मीटरमध्ये फेरफार करुन वीजचोरी करणार्‍या सातारा शहर व ग्रामीणमधील 10 औ

हेलिकॉप्टर अपघात टाळण्यासाठी काटकसरीचा नको : आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा सल्ला
मंगळवारी ना. शंभूराज देसाई यांचा जनता दरबार
’लतादीदींमुळे माझ्या बिर्याणीला नाव मिळाले; माझे नाव होऊन माझे अख्खे कुटुंब जगले’

14 लाख 47 हजार युनिटची चोरी; 3 कोटी 33 लाखांचा दंड
सातारा / प्रतिनिधी : वीजेच्या मीटरमध्ये फेरफार करुन वीजचोरी करणार्‍या सातारा शहर व ग्रामीणमधील 10 औद्योगिक ग्राहकांची वीजचोरी महावितरणच्या भरारी पथकाने उघडकीस आणली. या चोरट्यांना 3 कोटी 33 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. भरारी पथकाच्या धाडसी कारवाईने वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत, अशी माहिती महावितरणच्या बारामती विभागाच्या प्रसिध्दी विभागाकडून देण्यात आली.
याबाबत महावितरणच्या बारामती विभागाच्या प्रसिध्दी विभागाकडून मिळालेली माहिती अशी की, पुणे, कोल्हापूर, बारामती, सोलापूर व सातारा येथील भरारी पथकाने एकत्रित कारवाई करुन 10 मोठ्या उद्योगांची वीजचोरी उघडकीस आणली आहे. काही ठिकाणी 3 वर्षांपासून मीटरमध्ये फेरफार करुन वीजचोरी सुरु होती. परंतू, महावितरणच्या भरारी पथकाने चोरीचा पर्दाफाश केला. सातारा शहरातील 8 व नागेवाडी येथील 2 अशा 10 ग्राहकांचा यात समावेश आहे. त्यांनी तब्बल 14 लाख 47 हजार 106 इतक्या युनिटचा वापर चोरुन केला होता. या वीजचोरीपोटी त्यांना 1 कोटी 94 लाख 84 हजार तर तडजोड शुल्कापोटी 1 कोटी 38 लाख 20 हजारांचे वीजबील दिले आहे. दोन्ही मिळून ही रक्कम 3 कोटी 33 होते. यामध्ये अजून दोन ग्राहकांच्या रकमेची भर पडणार आहे. या सर्वांवर विद्युत कायदा 2003 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येत आहे.
कारवाईमध्ये सातारा औद्योगिक वसाहतीमधील मे. स्वप्निल प्रॉडक्ट, मे. फार्म मशिनरी अ‍ॅण्ड टुल्स, मे. पर्ल शेल्प कास्टींग, मे. अपूर्वा इंटरप्रायजेस, मे. समाधान फॅब्रीकेशन, मे. प्रिंट ओम पॅकेजिंग, मे. शिवराज एंटरप्रायजेस, मे. कुंभेश्‍वर एंटरप्रायजेस तसेच नागेवाडी येथील प्रकाश राजाराम घोरपडे, साई क्रश सॅण्ड अशा 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी सुरक्षा व अंमलबजावणी परिक्षेत्राचे उपसंचालक कमांडर शिवाजी इंदलकर यांचे मार्गदर्शनाखाली अतिरिक्त कार्यकारी अभियंता उज्ज्वला लोखंडे, दीपक कोथले, राकेश मगर, सुरेश जोगी व महेशकुमार राऊत यांच्यासह त्यांच्या संपूर्ण टीमने परिश्रम घेतले.

COMMENTS