Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वीजपंप चोरणारे कर्जत पोलिसांकडून जेरबंद

कर्जत/प्रतिनिधी ः विजेचा पंप चोरणार्‍या तिघांना कर्जत पोलिसांनी जेरबंद केले आहे. कर्जत तालुक्यातील भांबोरा येथील संभाजी माणिक थोरात यांच्या शेतात

साईनगरीत हार-फुलांच्या विक्रीस सुरवात
 गोयकरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस इंटरक्टिव पॅनल भेट
अंगावर स्लॅब कोसळून कामगार गंभीर जखमी

कर्जत/प्रतिनिधी ः विजेचा पंप चोरणार्‍या तिघांना कर्जत पोलिसांनी जेरबंद केले आहे. कर्जत तालुक्यातील भांबोरा येथील संभाजी माणिक थोरात यांच्या शेतातील वीजपंप चोरून नेणार्‍या तिघांना पोलिसांनी मंगळवारी दुपारी अटक करून वीज पंप जप्त केला आहे. थोरात यांच्या भांबोरा गावाच्या शिवारातील भीमा नदीच्या जवळील गट नंबर 200 मधून वीजपंप चोरी गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांकडून तपास सुरू होता. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे 18 एप्रिल रोजी गुन्ह्यात गेलेल्या मालाबाबत व आरोपींचा पोलिसांनी शोध घेतला. दरम्यान संशयित बापू गुलाब भारती, वय : 32 वर्षे, रा. गोसावी वस्ती, भांबोरा, दत्ता छगन कोळेकर, वय : 21 वर्ष, सुहास छगन कोळेकर, वय : 19 वर्षे, रा. कोळेकर वस्ती, भांबोरा यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी त्यांनी गुन्हा कबूल केला. पोलिसांनी चोरी गेलेला मुद्देमाल शोध घेऊन जप्त केला. डीवायएसपी अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीस नाईक संभाजी वाबळे, पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब काळे, मनोज मुरकुटे, अर्जुन पोकळे हे या कारवाई सहभागी झाले. पोलीस नाईक संभाजी वाबळे हे अधिक तपास करत आहेत.

COMMENTS