पाटण / प्रतिनिधी : पाटण महावितरण कंपनीचा लोंकाच्या जिवाशी खेळ चालला आहे. रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वनकुसवडे डोंगर पठारावरील घाणबी ये
पाटण / प्रतिनिधी : पाटण महावितरण कंपनीचा लोंकाच्या जिवाशी खेळ चालला आहे. रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वनकुसवडे डोंगर पठारावरील घाणबी येथील धाकु बमु शेळके यांच्या शेतात भात लागणीचे काम सुरू असताना विजेचा खांब अचानकपणे भात लावण करण्यासाठी केलेल्या चिखलात कोसळला. मात्र, विद्युत प्रवाह बंद असल्यामुळे जिवीतहानी झाली नाही. शेतात काम करणारर्या लोकांची घाबरगुंडी उडाली होती. याची माहिती पाटण महावितरण कार्यालयास कळताच विज कर्मचार्यांनी पोलवरील विद्युत तारा सोडवून विज पुरवठा सुरळीत केला. यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला. या घटनेमुळे महावितरण कंपनीचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे.
तालुक्यात अनेक गावांत विजेचे पोल गंजलेल्या अवस्थेत आहेत. महावितरण कंपनीला पोल बदलणेकामी अर्ज करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे अशा घटना घडून जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महावितरण कंपनीचे अधिकारी गतवषीॅ जून महिन्यांमध्ये गावागावांत गंजलेल्या, मोडकळीस आलेल्या पोलचा सर्वे करून गेले. मात्र, अजून परत फिरले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच यातून जर जिवीतहानी झाली तर याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
COMMENTS