लोहा प्रतिनिधी- लोहा येथील शिवलंच होम येथे दि. 11 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बुथ कमिटीची बैठक संपन्न झाली.यावेळी कार्यक्रमाच्या अध
लोहा प्रतिनिधी– लोहा येथील शिवलंच होम येथे दि. 11 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बुथ कमिटीची बैठक संपन्न झाली.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष हरिहर भोसीकर होते तर प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र येईलवाड,डी.बी.जांभरुनकर, बुथ कमिटीचे उतर जिल्हाध्यक्ष विक्रम देशमुख, बुथ कमिटीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष गजानन पांपटवार, कार्यक्रमाचे आयोजक माजी नगरसेवक रमेश माळी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवराज पाटील पवार, शहराध्यक्ष प्रभाकर पाटील पवार, विलास पाटील घोरबांड , विश्वाभंर भोसीकर, बंटी सावंत शरद जोशी, तानाजी वड,दिगांबंर सोनवळे, राष्ट्रवादी चे नेते डॉ. उतमराव सोनकांबळे,दिगाबंर गवळे,मारोती कांबळे, अजिश कुरेशी, लतीफ शेख, आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना हरिहर भोसीकर म्हणाले की, आजची तारीख आपल्यासाठी फार चांगली आहे आपण येथे महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त व बुथकमिटी निमित्त जमलोत मी प्रथम महात्मा ज्योतिबा फुले व माता सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करतो. बुथ कमिटीची बैठक संपुर्ण महाराष्ट्रात झाली पाहिजे असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयवंतराव पाटील यांनी दिले आहेत. आता लवकरच तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, सर्कल अध्यक्ष,बुथ कमिटीचे अध्यक्ष यांच्या निवडी करण्यात येतील. माजी आ. शंकर अण्णा धोंडगे यांना पक्षाने तिकीट दिले आमदार केले, शाळा दिल्या, त्यांच्या मुलाला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केले पण ते पळाले बीआरएस मध्ये गेले तिथे त्यांना लाचारी आहे त्यांच कुठल शेतकर्यांचे सरकार खर शेतकर्यांचे सरकार हे राष्ट्रवादीचे आहे असे हरिहर भोसीकर म्हणाले. तसेच यावेळी माजी नगरसेवक रमेश माळी म्हणाले की लोहा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवू.तसेच यावेळी रामचंद्र येईलवाड म्हणाले की, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल रोजी असुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संगुचीवाडी येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कंधार व लोहा येथे भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे त्यात सर्वांनी सामिल व्हावे तसेच प्रत्येक बुथ कार्यकत्यांनी 50 माणसे जोडावीत त्यामुळे आपला आमदार निश्चितच होईल असे रामचंद्र येईलवाड म्हणाले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर पाटील पवार यांनी केले. यावेळी बैठकीला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
COMMENTS