Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या शहराध्यक्षपदी सय्यद फेरोज यांची निवड

निवडीनंतर परळी शहरात जल्लोष

परळी वैजनाथ प्रतिनिधी- खा शरदचंद्रजी पवार यांच्या नेत्राखाली राष्ट्रवादी काँग्रेस युवक च्या शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे परळी येथे आयोजित

पॅराऑलिम्पिकमध्ये भारताची पदकांची लयलूट… जिंकली चार पदके
संगमनेर तालुक्याच्या वाट्याला नेहमी संघर्ष आला – बाळासाहेब थोरात
मकरसंक्रांतीनिमित्त पंतग विक्रीसाठी बाजारपेठ सजली  

परळी वैजनाथ प्रतिनिधी- खा शरदचंद्रजी पवार यांच्या नेत्राखाली राष्ट्रवादी काँग्रेस युवक च्या शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या नियोजन बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये युवकचे कार्यकर्ते सय्यद फेरोज यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बीड येथे 17 ऑगस्ट रोजी पक्षाचे सर्वेसर्वा तथा खा शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे या सभेच्या तयारीसाठी परळी येथे नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ संदीप क्षीरसागर, डॉ नरेंद्र काळे , माजी आमदार पृथ्वीराज साठे,ज्येष्ठ नेत्या सुदामतीताई गुट्टे, उद्योजक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सय्यद समद सेठ, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते यावेळी नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान खा शरद पवार यांच्या विचाराशी एकनिष्ठ राहून राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार तळागाळापर्यंत पोहोचण्याचा आणि बळकट देण्याचा येणार्‍या काळात प्रामाणिक प्रयत्न करून राष्ट्रवादी युवक ची एक नवी फळी एक नवी ताकद आपण परळी शहरात सर्व मान्यवरांच्या नेतृत्वाखाली निर्माण करू असा विश्वास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष सय्यद फेरोज यांनी व्यक्त केला निवडीनंतर परळी शहरात सर्व स्तरातून स्वागत होत आहे

COMMENTS