Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एमआयएमच्या परळी शहरध्यक्षपदी कादर कुरैशी यांची निवड

परळी वैजनाथ वार्ताहर - एआयएमआयएमच्या परळी शहरध्यक्षपदी कादर कुरेशी यांची निवड करण्यात आली आहे. दिनांक 14 जुलै रोजी एमआयएम बीड जिल्हा संपर्क कार्

राष्ट्रवादी काँगे्रसमधील संभ्रमता
भविष्यात शिवसेनेसोबत युती शक्य : अ‍ॅड. आंबेडकर
उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहावे

परळी वैजनाथ वार्ताहर – एआयएमआयएमच्या परळी शहरध्यक्षपदी कादर कुरेशी यांची निवड करण्यात आली आहे. दिनांक 14 जुलै रोजी एमआयएम बीड जिल्हा संपर्क कार्यालय येथे जिल्हा अध्यक्ष एड शफीक भाऊ यांच्या नेतृत्वाखाली बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते या बैठकीत चर्चा झाली नंतर एक मताने परळी शहरध्यक्षपदी  कादर कुरेशी यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र एआयएमआयएम बीड जिल्हा संपर्क कार्यालयात जिल्हा अध्यक्ष शफीक भाऊ आणि तालुका अध्यक्ष शेख शरीफ  यांच्या हस्ते देण्यात आले. या निवडीचे पत्र मिळाल्या नंतर  कादर कुरेशी यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदन होत  आहे. तर शहरातल्या युवकांनी फेसबुक व वाट्सआपच्या माध्यमातून अभिनंदन करत आहेत.
या पदाच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष संसदरत्न खा.बॅ.असदुद्दीन ओवेसी साहेब,आ.अकबरूद्दीन ओवेसी साहेब यांचे विचार, प्रदेशाध्यक्ष तथा खा.सय्यद इम्तियाज जलील साहेब,प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी साहेब व जिल्हा अध्यक्ष शफीक भाऊ यांचे धोरण-मोहीम जनमानसात रुजवून पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी परिश्रम घेईल अशी प्रतिक्रिया कादर भाई कुरेशी यांनी दिली आहे, व तसेच लवकरच खासदार इम्तियाज जलील यांची परी जाहीर सभा घेण्यात येईल असल्याचे जाहीर केले व माझ्या सारख्या एका सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास दाखवत एमआयएम पक्षाच्या परळी शहर अध्यक्ष पदी ह्या महत्वपूर्ण पदावर नेमणूक केल्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष संसदरत्न खा.बॅ.असदुद्दीन ओवेसी साहेब,आ.अकबरूद्दीन ओवेसी साहेब, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खा.सय्यद इम्तियाज जलील साहेब,प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी साहेब, जिल्हाध्यक्ष शेख शफीक भाऊ, परळी तालुकाध्यक्ष शेख शरिफ भाई, यांचे मनापासून आभार व्यक्त करतो, या बैठकीत एमआयएम बीड जिल्हाध्यक्ष शफीक भाऊ,याच्यांसह,  युवकचे जिल्हाध्यक्ष शेख मतीन भाई, बीड ता.अध्यक्ष शेख एजास, खन्ना भैय्या, परळी एम आय एमचे ता.अध्यक्ष शेख शरीफ भाई, वडवणी ता.अध्यक्ष अकबर पठाण, माजलगाव प्रभारी शेख सिद्दीक भाई, कार्याध्यक्ष फेरोज खान(जनाब), नुर भाई कुरेशी,शेख अश्फाक सेठ, नगरसेवक ताज खान पठाण, शेख मुस्तफा भाई, शेख मोहसीन, शेख शेख अनवर,तोफीक, शेख तोहीद, शेख अनवर, शेख फरहान, शेख मगदूम, युनूस साथी, अबुज़र कुरेशी, याच्यासह शेकडो कार्यकर्ते  उपस्थित होते.

COMMENTS