श्रीगोंदा प्रतिनिधी : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह या संदर्भात दिलेला निर्णय चुकीचा असून या निर्णयाचा जाहीर निषेध व्

श्रीगोंदा प्रतिनिधी : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह या संदर्भात दिलेला निर्णय चुकीचा असून या निर्णयाचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी श्रीगोंदा तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पूर्ण ताकदीनिशी एकवटला आहे. तालुक्यातील सर्व शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे तालुक्यातील शिवसैनिक निष्ठेने ठाकरे व मातोश्री यांच्या आदेशाने येणार्या काळामध्ये काम करणार आहेत
तालुकाप्रमुख माननीय श्री. बाळासाहेब दुतारे यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिवसैनिकांनी व पदाधिकार्यांनी तहसील कार्यालय श्रीगोंदा येथे जाऊन माननीय तहसीलदारांकडे निषेधाचे निवेदन देण्यात आले. यावेळेस शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब दूतारे, शहर प्रमुख संतोष खेतमाळीस व इतर पदाधिकार्यांनी अतिशय तीव्र शब्दात भाषण करून निषेध व्यक्त केला. या निषेधाच्या कार्यक्रमासाठी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निलेश साळुंके, नूतनताई पानसरे, शरद नागवडे, रावसाहेब डांगे, गणेश लाटे, सागर खेडकर, नितिन लोंखडे, संभाजी घोडके, बापू मस्के, जमीर भाई शेख, संतोष बोळगे, जनाबाई गायकवाड, नानासाहेब दुतारे, अनिल सुपेकर, हरिभाऊ काळे, शिवाजी समदडे, नितीन लोखंडे, ओमकार शिंदे, रोहिदास म्हस्के, महेश पोळ, अखिल शेख, दामोदर शिंदे, संतोष चिकलठाणे, सागर साळुंखे, तुकाराम सकट, संजय चिकलठाणे, सुनील घोडके, नितिन शिंदे, राजु तोरडे, सुनील शिंदे, प्रविण खेतमाळीस, चिमणराव बाराहाते, संदीप साबळे, संदीप साठे, अविनाश दिवटे, सोमनाथ नागरे, दादासाहेब मुंडेकरी, संदीप शिंदे, अनिकेत परदेशी, अनिकेत मांडे, कृष्णा भालेराव, लालासाहेब रसाळ इत्यादी पदाधिकार्यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS