जामखेड ः जामखेड तालुक्यातील जवळा, मतेवाडी, मूंजेवाडी या तीन ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम लागला असून 25 आँक्टोबर रोजी उमेदवारी अ
जामखेड ः जामखेड तालुक्यातील जवळा, मतेवाडी, मूंजेवाडी या तीन ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम लागला असून 25 आँक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी जवळा ग्रामपंचायतमध्ये सदसपदासाठी दाखल झालेल्या 14 जणांपैकी पँनलचे 2 तसेच अपक्ष 3 असे 5 जण निवडणूक रिंगणात उतरले आहेत. 15सदस्यपदासाठी दाखल झालेल्या 88 अर्जापैकी 30 जण पँनलचे तर 3 जण अपक्ष असे 33 जण निवडणूक रिंगणात उतरले तर 55 जणांनी माघार घेतली.
मतेवाडी ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदासाठी 2 जण तर सदसपदासाठी 13जण तसेच मूंजेवाडी ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदासाठी 3 तर सदस्यपदासाठी 13 जण निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तालुक्यात मोठी असलेल्या जवळा ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदासाठी शेतकरी ग्रामविकास आघाडी जवळा व जवळा ग्रामविकास पँनलचा प्रत्येकी एक उमेदवार आहे मात्र तीन पक्षही रिंगणात असल्याने मोठी चूरस हे होण्याची शक्यता आहे. सर्व उमेदवारांना चिन्हांचे वाटप निवडणूक आधिकार्यांनी केले असून 26 आँक्टोबरपासून प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात होणार आहे. यावेळी जवळा ग्रामपंचायतसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नंदकुमार गव्हाणे तर सहाय्यक म्हणून धूमाळ एम एस यांनी काम पाहिले आहे. मतेवाडी व मूंजेवाडी ग्रामपंचायतसाठी निवडणूक निर्णय अधिकारी लटके बी एस तर सहाय्यक म्हणून सुखदेव कारंडे, पी. व्ही. धावडे यांनी काम पाहिले आहे
शेतकरी ग्रामविकास जवळा पॅनल- जवळा ग्रामपंचायतमध्ये राजकीय, सामाजिक क्षेत्रातून जूने नवे तसेच विविध पक्षांचे दिग्गजांनी एकत्र येऊन शेतकरी ग्रामविकास आघाडीजवळा पँनल उभा केला आहे. या पॅनेलमध्ये सर्वंच दिग्गज एकत्र आल्यामुळे या पॅनलचे वर्चस्व राहणार असल्याचे एकंदरित चित्र दिसून येत आहे.
COMMENTS