Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रुग्णालयात भरती पतीच्या भेटीस जाणार्‍या वृद्ध महिलेचा बसच्या धडकेत मृत्यू

लातूर प्रतिनिधी - सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या पतीस भेटण्यासाठी जाताना वृद्ध महिलेस बसने धडक दिली. त्यात ती गंभीर जखमी झाली. उपचारा

अपघातात कार चालक गंभीर जखमी
अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ गावातील तिघा तरुणांवर एकाच दिवशी काळाचा घाला
मुंबई- पुणे हायवेवर अपघातात तिघांचा दुर्देवी मृत्यू

लातूर प्रतिनिधी – सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या पतीस भेटण्यासाठी जाताना वृद्ध महिलेस बसने धडक दिली. त्यात ती गंभीर जखमी झाली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी मुलाच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिसांत बुधवारी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजाबाई नारायण कलवले (77, रा. हडोळती, ता. अहमदपूर) असे मयत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, शहरातील बार्शी रोडवरील राजे शिवाजीनगरात तुकाराम कलवले व त्यांचे कुटुंबीय राहतात. त्यांचे वडील नारायण कलवले हे आजारी असल्याने त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या देखभालीसाठी तुकाराम कलवले यांच्या आई राजाबाई कलवले ह्या दररोज टोरिक्षाने सरकारी रुग्णालयात ये-जा करीत होते.  दरम्यान, 10 जून रोजी दुपारी त्या रुग्णालयाकडे जाण्यासाठी मिनी मार्केट येथे रस्ता ओलांडताना एमएच 20, बीएल 3878 क्रमांकाच्या बसचालकाने धडक दिली. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यामुळे त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू होते. 12 जून रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी तुकाराम कलवले यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिसांत बसचालकाविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS