Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एकनाथ खडसेंना घरवापसीची ऑफर

विनोद तावडेंनी दिली पुन्हा भाजपमध्ये येण्याची संधी

मुंबई/प्रतिनिधी ः भाजपपासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने फारकत घेतल्यापासून आणि काही ओबीसी नेत्यांना डावलल्यामुळे भाजपची पीछेहाट होतांना दिसून येत

श्रीगोंद्यात शिवसेनेची महिला शाखा कार्यकारिणी जाहीर
शाहरुख खानची पत्नी गौरी खान अडचणीत
महसुली नोंदी असणार्‍यांना कुणबी दाखले

मुंबई/प्रतिनिधी ः भाजपपासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने फारकत घेतल्यापासून आणि काही ओबीसी नेत्यांना डावलल्यामुळे भाजपची पीछेहाट होतांना दिसून येत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर भाजपने पुन्हा एकदा नव्याने रणनीती आखत, जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर भाजप नेते विनोद तावडे यांनी एकनाथ खडसे यांना पुन्हा भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण देत भावनिक साद घातली आहे. नाथाभाऊ तुम्ही परत भाजपमध्ये या असे तावडे यांनी म्हटले आहे.
तावडे यांचे केंद्रात चांगलेच वजन वाढले असून, त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये खडसेंना घरवापसीची ऑफर दिल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या मुलाखतीमध्ये तावडे यांनी म्हटले की, मला असे वाटते की, नाथाभाऊंनी परत आले पाहिजे. पक्षात अशाप्रकारच्या लीडरशीपची गरज आहेच. खडसे यांना ग्रामीण महाराष्ट्राची चांगली जाण असून त्यांच्यासारखा नेता भाजपमध्ये असावा. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ लोकांनी येणे.. पण नुसतं येताना नाथाभाऊ ज्या स्पष्टपणे बोलतात तसे अपेक्षित नसेल. पण जी-जी माणसे पक्षात आली पाहिजे असे आम्हाला वाटते त्यात नाथाभाऊ आहेत, असे विनोद तावडे यांनी म्हटले आहे. विनोद तावडे यांच्या या वक्तव्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत स्तरावर वेगळ्याच हालचाली सुरु आहेत का, अशी शंका अनेकांच्या मनात उत्पन्न झाली आहे. खडसे यांची भाजपमध्ये येण्याची इच्छा असेल, तर फडणवीस हे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि स्थानिक नेत्यांशी चर्चा करून उचित निर्णय घेतील. पण खडसे यांना भाजपच्या शिस्तीचे पालन करावेच लागेल, असेही विनोद तावडे यांनी म्हटले. परंतु, माझे एकनाथ खडसे किंवा पक्षश्रेष्ठींशी माझे बोलणे झालेले नाही किंवा त्यांना प्रस्ताव दिलेला नाही, अशी पुस्तीही विनोद तावडे यांनी जोडली.

भाजपमध्ये पुन्हा जाणार नाही ः खडसे – विनोद तावडे यांच्या या आमंत्रणावर एकनाथ खडसे म्हणाले की, विनोद तावडे आणि आम्ही गेले अनेक वर्षे भारतीय जनता पार्टीचे काम करत होतो. भाजपमध्ये विनोद तावडेंचे योगदान खूप आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर त्यांना वाटत असावे की जुन्या लोकांनी पक्षात यावे. कर्नाटकच्या पराभवावरून त्यांना असे वाटले असावे की जुन्या नेत्यांनी पक्षात परत यावे असे खडसे यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, मात्र ज्या पक्षासाठी इतके केले. 2014 पासून माझा ज्या पक्षात छळ झाला. अनेक चौकशी लावण्यात आल्या त्या पक्षात आता मी पुन्हा जाणार नाही. भाजपमध्ये ज्यांच्यावर मोठे मोठे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ते पक्षात येऊन स्वच्छ झाले. अडचणीच्या काळात शरद पवार यांनी मला विधानपरिषदचे सदस्य बनवून राजकीय विजनवासातून बाहेर काढले. त्यामुळे भाजपमध्ये जाण्याचा प्रश्‍नच नाही अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

COMMENTS