Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधान परिषदेच्या गटनेतेपदी एकनाथ खडसे

मुंबई/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाने एकनाथ खडसे यांच्या खांद्यावर विधानपरिषदेच्या गटनेतेपदाची धुरा सोपवली आहे. विधान परिषदेच्या उपसभापत

अपहृत अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन उच्च न्यायालयात हजर करा | DAINIK LOKMNTHAN
पंढरपुरात चार तरुणांना रेल्वेने उडवले.
 खामगावात ‘ट्रान्झिट ट्रीटमेंट’ केंद्राला मान्यता, जखमी वन्यप्राण्यांवर होणार उपचार

मुंबई/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाने एकनाथ खडसे यांच्या खांद्यावर विधानपरिषदेच्या गटनेतेपदाची धुरा सोपवली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांची विधान परिषदेच्या गटनेतेपदी वर्णी लागल्याची शक्यता वर्तवली जात होती. तसे पत्रही विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांना देण्यात आले होते. त्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले असून विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. तसेच विधान परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतोदपदी आमदार अनिकेत तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप नेते गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात राजकीय संघर्ष अनेकवेळा जळगावमध्ये पाहायला मिळतो. खडसे राष्ट्रवादीत आल्यानंतर ते विधानपरिषदेवर आमदार झाले. त्यानंतर आता त्यांच्यावर राष्ट्रवादीने पुन्हा मोठी जबाबदारी दिली आहे. खडसे यांच्याकडे अनेक वर्षाचा सभागृहातील कामकाजाचा अनुभव आहे. खडसे यांच्या नियुक्ती करत राष्ट्रवादीने एकप्रकारे भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.

COMMENTS