Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्ह्यातील पाच पाणी योजनांसाठीसाडे अठरा कोटीचा निधी मंजूर

अकोले व पारनेरला होणार योजना

अहमदनगर/प्रतिनिधी ः जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील पाच नळ पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. राज्य सरकारच्या पाणी पुरवठ

साखर कारखाना विक्री घोटाळ्याचा खटला पारनेर न्यायालयात
BREAKING: जिल्हाधिकारींना भेटण्यास करोन RT–PCR टेस्ट बंधनकारक | Ahmednagar | Lok News24
ह.भ.प.बाबाजी महाराज चाळक यांच्या हस्ते लोकनेते आण्णासाहेब शेलार यांच्या श्रीगोंदा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

अहमदनगर/प्रतिनिधी ः जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील पाच नळ पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. राज्य सरकारच्या पाणी पुरवठा विभागाने नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील तीन आणि पारनेर तालुक्यातील दोन अशा पाच पाणी योजनांना प्रशासकीय मान्यता दिल्यामुळे या पाच गावांतील पाणी प्रश्‍न कायमस्वरुपी मिटणार आहे. या पाच योजनांसाठी 18 कोटी 55 लाखांच्या निधीलाही मंजुरी दिली गेली आहे. दोन दिवसांपूर्वी याबाबतचा शासन निर्णय पाणी पुरवठा विभागाने काढला आहे.

नगर जिल्ह्यातील पाच पाणी पुरवठा योजनांचा दरडोई खर्च हा विहीत निकषांपेक्षा जास्त असल्यामुळे याठिकाणी नवीन पाणी योजनांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी राज्य सरकारच्या पाणी पुरवठा विभागाकडे मंजुरीसाठी पाठवले होते. ग्रामीण भागात प्रत्येक घरातील व्यक्तीला दरडोई 55 लिटरप्रमाणे पाणी मिळावे, यासाठी केंद्र सरकारच्या सहकार्यातून राष्ट्रीय जल जीवन मिशन कार्यक्रम सुरू आहे. या मिशनसाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी पाण्याची गुणवत्ता आणि देखभालीसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

त्यानुसार अकोल तालुक्यातील खिरेविरे गावासाठी 4 कोटी 30 लाख 5 हजारांची, केळी ओतूर गावसाठी 4 कोटी 18 लाख 83 हजारांची व कोंभाळणे गावासाठी 2 कोटी 36 लाख 80 हजारांची तसेच पारनेर तालुक्यातील खडकवाडी गावासाठी 3 कोटी 78 लाख 53 हजाराची व शिरापूर गावासाठी 3 कोटी 91 लाख 52 हजार रुपयांच्या पाणी योजनांना मंजुरी देण्यात आली आहे.
या योजनांची कामे जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाच्यावतीने करण्यात येणार असून योजना पूर्ण झाल्यावर एका महिन्यांत संबंधित ग्रामपंचायतीला योजना हस्तांतरण करावी लागणार आहे. योजना पूर्ण झाल्यावर वर्षभर योजना तयार करणार्‍या कंत्राटदाराला ती चालवावी लागणार आहे. मात्र, संबंधित ग्रामपंचायतींना त्या वर्षभरात पाणीपट्टी नळ जोडणीधारक यांच्याकडून पाणीपट्टी वसूल करावी लागणार आहे.  

COMMENTS