भूतबाधा काढण्यासाठी घेतले आठ हजार रुपये; नगरच्या वैदूवाडीत अंधश्रद्धेचा प्रकार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भूतबाधा काढण्यासाठी घेतले आठ हजार रुपये; नगरच्या वैदूवाडीत अंधश्रद्धेचा प्रकार

अहमदनगर/प्रतिनिधी : मुलीच्या अंगातील भूतबाधा काढून देण्यासाठी आर्थिक लूट आणि मारहाण करण्याची घटना नगरच्या सावेडी उपनगरातील वैदूवाडी भिस्तबाग या ठिकाण

पाथर्डीत महिलेबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल
*डेल्टा प्लसचा महाराष्ट्रात पहिला बळी l DAINIK LOKMNTHAN*
सोमवारच्या महाराष्ट्र बंदमध्ये शहर जिल्हा काँग्रेस सहभागी होणार – किरण काळे

अहमदनगर/प्रतिनिधी : मुलीच्या अंगातील भूतबाधा काढून देण्यासाठी आर्थिक लूट आणि मारहाण करण्याची घटना नगरच्या सावेडी उपनगरातील वैदूवाडी भिस्तबाग या ठिकाणी घडली. पंंधरा वर्षीय मुलीच्या अंगातील भूत काढून देण्यासाठी होम करून कोंबडी कापून भूतबाधा काढण्यासाठीचा अंधश्रद्धेचा प्रकार घडला आहे. ही भूतबाधा काढण्यासाठी आठ हजार रुपये संबंधित तिघांनी घेतले. मात्र, भूत काढण्याच्या नावाखाली लूट झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पैसे परत मागितले असता तिघांनी त्यांना मारहाण केली.
या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात संबंधित पंधरा वर्षीय मुलीच्या (रा. वैदूवाडी, भिस्तबाग चौक) तक्रारीवरून अविनाश धनगर, आरती अविनाश धनगर (रा. वैदूवाडी, भिस्तबाग चौक), एक अनोळखी पुरुष (गुरू, पत्ता माहिती नाही) अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, येथील एका महिलेने तिची मुलगी सारखी फाशी घेण्याचा प्रयत्न करते म्हणून एका मांत्रिकाकडे गेली. तेव्हा त्यांनी मुलीच्या अंगात एका फाशी घेतलेल्या मुलीची भूतबाधा झाली असल्याचे सांगितले. त्यावर तोडगा म्हणून होम करून कोंबडी कापण्यात आली, तसेच यासाठी आठ हजार रुपये घेण्यात आले. विधी करण्यासाठी एका मांत्रिकाला आणण्यात आले होते. यानंतर तिघांनी आता तुमच्या मुलीच्या अंगातील भूतबाधा नष्ट झाल्याचे सांगितले. पण, भूत काढण्याच्या अंधश्रद्धेच्या नावाखाली आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने महिलेने त्यांच्याना दिलेले पैसे परत मागितले असता त्यांनी त्या महिलेला मारहाण केली. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मुजावर पुढील तपास करत आहेत. दरम्यान, सावेडी परिसरातील ही अंधश्रद्धेची घटना चर्चेची झाली आहे.

COMMENTS