Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्याचा प्रयत्न ः आ. आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी : मतदार संघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने मतदार संघातील रस्ते, पाणी, वीज या मुलभूत प्रश्‍नांची सोडवणूक करून जनतेला दिलेला प्रत्ये

मा. नामदार आशुतोषदादा काळे यांच्या वाढदिवसानिमित्त जनता इंग्लिश स्कूल संवत्सर विद्यालयात शालेय वस्तूचे वाटप.
कांदा निर्यात शूल्काचा फेरविचार व्हावा ः आ. आशुतोष काळे
2.15 कोटीच्या कामास प्रशासकीय मान्यता ः आ. आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी : मतदार संघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने मतदार संघातील रस्ते, पाणी, वीज या मुलभूत प्रश्‍नांची सोडवणूक करून जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे. भोजडे येथे विविध योजनांअंतर्गत 23.75 लक्ष रुपये निधीतून गावअंतर्गत सौर पथदिवे बसवणे, नागरी सुविधा केंद्र इमारत तसेच ओपन जिम साहित्याचे लोकार्पण व सौदागर एकता एज्युकेशन सोसायटीच्या भोजडे शाखेचे उदघाटन आ. आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार संघातील जनतेला दिलेली बहुतांश आश्‍वासने मागील साडे तीन वर्षात पूर्ण केली आहे. उर्वरित आश्‍वासने देखील लवकरच पूर्ण होणार असून त्यासाठी पाठपूरावा सुरु आहे. ज्या प्रमाणे सर्व जाती धर्माच्या नागरिकांशी काळे परिवाराचे जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आहेत त्याप्रमाणे मुस्लीम समाजाशी देखील आपुलकीचे नाते आहे. काळे परिवाराची हि परंपरा पुढे सुरु ठेवून मतदार संघातील सर्वच जाती धर्माच्या नागरिकांनी केलेल्या मागण्या पूर्ण केल्या असून भोजडेच्या मुस्लीम समाजाच्या मागण्या देखील पूर्ण करणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले. यावेळी ह.भ.प. परशुराम महाराज अनर्थे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे, जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादी काँग्रेस युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सीनगर, भाऊसाहेब सिनगर, अ‍ॅड. भालेराव, सुधाकर वादे, दत्तात्रय सीनगर, मोहसीन सय्यद, वाल्मीक सिनगर, विजय साबळे, सचिन घनघाव, अजित सीनगर, दत्तात्रय सिनगर, दिलीप सिनगर, संतोष सिनगर, बाळासाहेब सिनगर, विक्रम मंचरे, मिथुन गायकवाड, अजय पवार, किरण आहेर, इकलास पटेल, दादाभाऊ बोर्डे, धोंडीराम धट, अनंत सिनगर, मुकुंद सिनगर, नानासाहेब महाले, अविनाश जेऊघाले, आत्माराम अनर्थे, रावसाहेब सिनगर, गणेश धट, राजू पवार, संतोष जगताप, अशोक धट, निकेश घनघाव, अक्षय सिनगर, विजय सिनगर, दादाभाऊ सिनगर, अविनाश मोरे, राजू घनघाव, विजय घनगाव, इकलास सय्यद, गुलाब शेख, इब्राहिम शेख, तौफिक शेख ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे संचालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS