Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची विज्ञान केंद्रास भेट

सुपा : न्यू इंग्लिश स्कूल, सुपा येथील इयत्ता पाचवी ते नववीच्या सुमारे दीडशे विद्यार्थ्यांनी मंगळवारी (ता. ११) सातारा येथील ‘रयत सायन्स अँड इनोव्हेशन अ‍ॅक्टिव्हिटी सेंट’ला शैक्षणिक भेट दिली. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण करणे, प्रयोगांद्वारे शिकण्याची सवय वाढवणे तसेच नवोन्मेषी विचारांना चालना देणे, हा या सहलीचा उद्देश होता. केंद्रात विविध विज्ञान प्रयोग, आकर्षक मॉडेल्स, इनोव्हेशन हॉल आणि तंत्रज्ञानाशी संबंधित प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी पाहिली. विद्यार्थ्यांनी विविध मॉडेल्स प्रत्यक्ष हाताळून पाहिल्याने विज्ञान हा केवळ पुस्तकातील विषय नसून तो दैनंदिन जीवनाशी जोडलेला असल्याची जाणीव विद्यार्थ्यांना झाली. मार्गदर्शकांनी दिलेल्या माहितीमुळे विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञानाविषयी जिज्ञासा आणि आत्मविश्वास वाढीस लागल्याचे शिक्षकांनी सांगितले.या भेटीमुळे विद्यार्थ्यांना विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात भविष्यात नावीन्यपूर्ण कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याचेही नमूद करण्यात आले. सहलीचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल मुख्याध्यापक एम. के. जाधव, शिक्षकवृंद आणि व्यवस्थापन मंडळाचे आभार मानण्यात आले. या सहलीत शिक्षक बबन शिंदे, अभिजीत जाधव, संजय बर्डे, सुवर्णा पाडेकर, प्रतिभा फलके, रूपाली ढाकणे, अश्विनी हावरे, मनीषा गोत्राळ, संगीता चव्हाण, साधना थोरात, पुष्पा शिंदे आदी सहभागी होते.

सुपा येथे महाशिवरात्री उत्साहात
भाजप ट्रान्सपोर्ट सेल व कामगार युनियनच्या तालुकाध्यक्षपदी ठोंबरे
पत्रकार हे घेणारे नाही; तर देणारे : डॉ.आरोटे

सुपा : न्यू इंग्लिश स्कूल, सुपा येथील इयत्ता पाचवी ते नववीच्या सुमारे दीडशे विद्यार्थ्यांनी मंगळवारी (ता. ११) सातारा येथील ‘रयत सायन्स अँड इनोव्हेशन अ‍ॅक्टिव्हिटी सेंट’ला शैक्षणिक भेट दिली. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण करणे, प्रयोगांद्वारे शिकण्याची सवय वाढवणे तसेच नवोन्मेषी विचारांना चालना देणे, हा या सहलीचा उद्देश होता. केंद्रात विविध विज्ञान प्रयोग, आकर्षक मॉडेल्स, इनोव्हेशन हॉल आणि तंत्रज्ञानाशी संबंधित प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी पाहिली.

विद्यार्थ्यांनी विविध मॉडेल्स प्रत्यक्ष हाताळून पाहिल्याने विज्ञान हा केवळ पुस्तकातील विषय नसून तो दैनंदिन जीवनाशी जोडलेला असल्याची जाणीव विद्यार्थ्यांना झाली. मार्गदर्शकांनी दिलेल्या माहितीमुळे विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञानाविषयी जिज्ञासा आणि आत्मविश्वास वाढीस लागल्याचे शिक्षकांनी सांगितले.या भेटीमुळे विद्यार्थ्यांना विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात भविष्यात नावीन्यपूर्ण कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याचेही नमूद करण्यात आले. सहलीचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल मुख्याध्यापक एम. के. जाधव, शिक्षकवृंद आणि व्यवस्थापन मंडळाचे आभार मानण्यात आले.

या सहलीत शिक्षक बबन शिंदे, अभिजीत जाधव, संजय बर्डे, सुवर्णा पाडेकर, प्रतिभा फलके, रूपाली ढाकणे, अश्विनी हावरे, मनीषा गोत्राळ, संगीता चव्हाण, साधना थोरात, पुष्पा शिंदे आदी सहभागी होते.

COMMENTS