रात्रशाळेबाबत सर्वसमावेशक धोरण तयार करणार – शिक्षणमंत्री दीपक केसरकर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रात्रशाळेबाबत सर्वसमावेशक धोरण तयार करणार – शिक्षणमंत्री दीपक केसरकर

मुंबई: राज्यातील रात्रशाळांबाबत सर्वसमावेशक धोरण दोन महिन्यामध्ये तयार करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिल

Beed :शरद जाधव यांचे अमृता नदीत जलसमाधी आंदोलन (Video)
Ahmednagar : जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची लोकमंथन कार्यालयास भेट (Video)
लाल परी च्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लाल बावटा प्रयत्न करणार – आमदार कॉ. विनोद निकोले

मुंबई: राज्यातील रात्रशाळांबाबत सर्वसमावेशक धोरण दोन महिन्यामध्ये तयार करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली. राज्यातील रात्रशाळांकरिता सर्वांकष धोरण निश्चित करण्याबाबत सदस्य नागोराव गाणार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना शालेय शिक्षणमंत्री केसरकर बोलत होते. शालेय शिक्षणमंत्री श्री. केसरकर म्हणाले की, शिक्षकांच्या प्रश्नांबाबत सर्वसमावेशक असे धोरण ठरवून, शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी अभ्यासक्रमात बदल करण्याच्या दृष्टीने विचारविनिमय करण्यात येईल. तसेच या शाळांचे प्रश्न टप्प्याटप्प्याने सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सर्वसमावेशक धोरणात विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून त्याप्रमाणे धोरण आखण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या प्रश्नाच्या वेळी सदस्य सर्वश्री प्रवीण दरेकर ,कपिल पाटील यांनी सहभाग घेतला.

COMMENTS