Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जयंत पाटलांना दुसर्‍यांदा ईडीचे समन्स

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दुसर्‍यांदा समन्स बजावले आहे. 22 मे रोजी चौकशीला हजर र

टक्केवारी घेतल्याचे सिद्ध करा, नाहीतर तुम्ही राजीनामे द्या
दसरा मेळाव्यात कोल्हे कुई… करतात ते ऐकायला जाऊ नका !
विकास कामांसाठी नगर परिषदेला भरघोस निधी उपलब्ध करुन देणार – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दुसर्‍यांदा समन्स बजावले आहे. 22 मे रोजी चौकशीला हजर राहण्याची सूचना या समन्समध्ये करण्यात आली आहे. आयएल आणि एफएस प्रकरणी हे समन्स बजावण्यात आले आहे. याआधी जयंत पाटील यांना गेल्या गुरुवारी हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते. मात्र त्यांनी वेळ वाढवून मागितली. त्यांची विनंती मान्य करत ईडीने त्यांना एक आठवड्यानंतरची तारीख दिली आहे.
दरम्यान जयंत पाटील यांच्याशी संबंधित काही संस्थांना ’आयएल अँड एफएस’ प्रकरणातील काही आरोपी कंपन्यांनी ’कमिशन रक्कम’ दिल्याचा आरोप ईडीने केला आहे आणि याच व्यवहारांबद्दल जयंत पाटील यांची चौकशी करून त्यांचा जबाब नोंदवला जाईल. मात्र या आलेल्या नोटीसवर प्रतिक्रिया देताना पाटील यांनी म्हटले आहे की, ज्या ’आयएल अँड एफएस’ कंपनीच्या प्रकरणात ईडीने नोटीस बजावली आहे, त्या कंपनीसोबत माझा रुपयाचाही व्यवहार नाही. जिथे काही देणे-घेणेच नाही, तिथे नोटीस काढली जात आहे. ईडी नोटीस का काढते, हे सगळ्या देशाला माहित आहे.

COMMENTS