मुंबई ः ठाकरे गटाने बुधवारी लोकसभेसाठी आपले 17 उमेदवार जाहीर केले, त्यामध्ये अमोल कीर्तिकर यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र त्या
मुंबई ः ठाकरे गटाने बुधवारी लोकसभेसाठी आपले 17 उमेदवार जाहीर केले, त्यामध्ये अमोल कीर्तिकर यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र त्यांना उमेदवारी करून काही तास होत नाही तोच त्यांना अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने खिचडी घोटाळाप्रकरणी समन्स बजावले आहे. अमोल कीर्तिकर यांना मुंबई-उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून कीर्तिकर यांना उमेदवारी देणार आली आहे.
खिचडी घोटाळा हा स्थलांतरित मजुरांना खिचडी पुरवण्याचे कंत्राट फसवणूक करण्याबाबत आहे. आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे की बीएमसीच्या भायखळा कार्यालयात 9 एप्रिल 2020 रोजी झालेल्या बैठकीत स्वयंपाकघर आणि आरोग्य विभागाचे प्रमाणपत्र असण्यासह कंत्राट देण्यासाठी निकष स्थापित केले गेले. असे असूनही, या आवश्यकतांची पूर्तता न करता वैष्णवी किचन/सह्याद्री रिफ्रेशमेंट आणि सुनील उर्फ बाळा कदम यांना कंत्राट देण्यात आले. त्यांनी कामाचे उपकंत्राट इतरांना दिले आणि सहमतीपेक्षा लहान अन्न पार्सल दिले.सुनील उर्फ बाळा कदम, राजू साळुंखे, सुजित पाटकर, शिवसेनेचे अर्थात ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि ज्येष्ठ नेते संजय राऊत यांचे सहकारी आणि बीएमसी कर्मचार्यांसह अनेकांवर फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS