Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ईडीने केले व्हीआयपीएस’ची 5 कोटींची मालमत्ता जप्त

पुणे ः राज्यात अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून पुन्हा एकदा छापेमारी करण्यात येत आहे. ईडीच्या रडारवर असलेल्या पुण्यातील व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कं

मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवणारे आंदोलक पोलिसांच्या ताब्यात
मित्राच्या घरी पोलिसाची आत्महत्या | LOKNews24
व्यापार्‍यांनी केला आ. आशुतोष काळेंचा सत्कार

पुणे ः राज्यात अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून पुन्हा एकदा छापेमारी करण्यात येत आहे. ईडीच्या रडारवर असलेल्या पुण्यातील व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीची 5 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. या कंपनीने जादा परताव्याचे आमिष देत गुंतवणूकदारांची 100 कोटी रुपयांंची फसवणूक केली होती. याप्रकरणी ईडीने पुणे, नाशिक, कोल्हापूर येथील कार्यालयांवर छापे टाकले होते.
व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीच्या पुणे, नाशिक, कोल्हापूर परिसरातील कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. या कारवाईत रोकड, मुदत ठेवीच्या पावत्या, दागिने असा 5 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. व्हीआयपीएस कंपनीचे संचालक विनोद तुकाराम खुटे, संतोष तुकाराम खुटे, मंगेश खुटे (तिघे रा. निर्माण व्हिवा सोसायटी, सिंहगड महाविद्यालयाजवळ, आंबेगाव बुद्रुक), किरण पितांबर अनारसे, अजिंक्य बडघे यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवून व्हीआयपीएस कंपनीचा संचालक विनोद खुटे आणि साथीदारांनी फसवणूक केली होती. आंबेगाव बुद्रुक परिसरातील कार्यालयाला खुटे टाळे लावून पसार झाला. गुंतवणूकदारांना परतावा दिला नसल्याने शेकडो गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. तपासात खुटे आणि साथीदारांनी 100 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. याबाबत ईडीचे सहायक संचालक रत्नेशकुमार कर्ण (43) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. ईडीकडून या प्रकरणात तपास करण्यात येत होता. गेल्या वर्षी जून महिन्यात ईडीने पुणे, मुंबई, अहमदाबादमधील व्हीआयपीएस कंपनी तसेच अहमदाबादमधील ग्लोबल फिलेट बिझनेस या वित्तीय संस्थांवर कारवाई केली होती. ईडीच्या मुंबई विभागीय कार्यालयाने ही कारवाई केली होती. पीएमएलए (प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग क्ट) कायद्यान्वये कारवाई केली होती. विनोद खुटेच्या कुटुंबीयांच्या नावे असलेली 8 कोटी 98 लाख रुपयांची मालमत्ता, व्हीआयपीएस आणि ग्लोबल फिलेट बिझनेस कंपनीच्या नावावर असलेल्या 5 सदनिका, 2 मालमत्ता, 2 कार्यालये आणि नगर येथील दोन हेक्टर जमीन जप्त करण्यात आली होती. मार्च महिन्यात ईडीने छापे टाकून 24 कोटी 41 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. फसवणूक प्रकरणाचा मुख्य सूत्रधार विनोद खुटे याने वेगवेगळ्या नावे दोन वित्तीय संस्था सुरू करून गुंतवणूकदारांची 100 कोटी रुपयांहून जास्त रकमेची फसवणूक केली होती. हवालाच्या माध्यमातून त्याने ही रक्कम परदेशात पाठवल्याचे तपासात उघडकीस आले होते. आतापर्यंत 70 कोटी 89 लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

COMMENTS