Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंगलदास बांदल यांच्या घरी ईडीचे छापे ;85 कोटींची मालमत्ता जप्त

पुणे :पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या अडचणीत वाढ होतांना दिसून येत आहे. कारण पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक फसवणूकप्

पंतगाच्या मागे धावताना 13 वर्षांच्या मुलाचा दम लागुन मृत्यू
शिक्षक मतदार संघाची अशी असेल मतदान प्रक्रिया
‘बेटी बचावो, बेटी पढावो’ ही चळवळ प्रभावी ठरली :पंतप्रधान मोदी

पुणे :पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या अडचणीत वाढ होतांना दिसून येत आहे. कारण पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक फसवणूकप्रकरणी ईडीने बांदल यांच्या घरावर छापे टाकत मंगलदास बांदल, हनुमंत संभाजी खेमधारे, सतीश जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या 85 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने टाच आणली आहे.
पीएमएलए कायद्यानुसार या सर्वांच्या पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर येथील स्थावर मालमत्तांवर ईडीने टाच आणली आहे. बांदल यांच्या पुण्यातील महंमदवाडी, शिक्रापूर आणि बुरुंजवाडी (ता.शिरूर) येथील निवासस्थानांवर ईडीच्या पथकाने ऑगस्ट महिन्यात छापे टाकले होते. मंगलदास बांदल यांच्याकडे 5 आलिशान गाड्या आणि 1 कोटी किमतीची चार मनगटी घड्याळेही आढळून आली होती.

COMMENTS