Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुवर्णनगरीत ईडीकडून छापेमारी

राजमल लखीचंद ज्वेलर्सची चौकशी राष्ट्रवादीची आर्थिक रसद तोडण्याची चर्चा

जळगाव/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर आता राष्ट्रवादी काँगे्रसचे खजीनदार आणि माजी खासदार ईश्‍वर जैन यांच्या जळगावमधील रा

हादगाव- निवघ्यातील अवैध धंद्यांना अभय कोणाचे ?
दौंड तालुक्यातील अपघातात दोन महिलांचा मृत्यू
जळगावमध्ये पत्रकाराला बेदम मारहाण

जळगाव/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर आता राष्ट्रवादी काँगे्रसचे खजीनदार आणि माजी खासदार ईश्‍वर जैन यांच्या जळगावमधील राजमल लखीचंद ज्वेलर्सवर अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने छापेमारी केली असून, शुक्रवादी सलग दुसर्‍या दिवशी देखील ईडीच्या अधिकार्‍यांकडून चौकशी सुरू होती.
स्टेट बँकेकडून घेतलेल्या आणि थकीत असलेल्या कर्जाच्या पोटीही ईडी चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. गेल्या चोवीस तासांपासून ही कारवाई सुरू असून शुक्रवारी पहाटे चार वाजेपर्यंत ईडी अधिकार्‍यांनी राजमल लखीचंद ज्वेलर्समधील सोन्याच्या दागिन्यांचे मूल्यांकन करण्याचे आणि आर्थिक व्यवहार कागदपत्रांची तपासणी केल्याची सूत्रांची माहिती आहे. जळगाव शहरातील राजमल लखीचंद अर्थात आर एल समूहाच्या विविध आस्थापनांवर ईडीकडून एकाचवेळी सहा ठिकाणी छापेमारी करण्यात आली. त्यात जळगावमधील आर एल ज्वेलर्स, मानराज आणि नेक्सा शोरूमचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर येथील साठ अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या समावेश आहे. या घटनेत माजी आमदार मनीष जैन यांचीही चौकशी केल्याचे समोर आले आहे. मात्र माजी खासदार ईश्‍वर जैन हे गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांची चौकशी करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे.
 सांगण्यात येत आहे. राजमल लखीचंद ग्रुपतर्फे ईडी अधिकार्‍यांना जी काही माहिती आवश्यक वाटत आहे, त्याबाबत राजमल लखीचंद ग्रुपकडून पूर्ण सहकार्य केले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, गुरुवारी सायंकाळपासून ईडी पथकाने चौकशी सुरू केल्यापासून राजमल लखीचंद ग्रुपमधील सर्वांचे मोबाईल बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे अद्याप नेमकी माहिती शकलेली नाही. गेल्या चोवीस तासांपासून सुरू असलेली ही कारवाई शुक्रवारी देखील उशीरापर्यंत सुरू होती. त्यामुळे या ईडी तपासणीत काय काय हाती काय लागते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मागील काळातही सीबीआयने चौकशी केली होती. त्यावेळी काही निष्पन्न झाले का? याबाबत देखील माहिती समोर आली नाही. त्यानंतर आता या कारवाईमध्ये काय मिळते की केवळ चौकशीचा फार्स ठरतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ईडी कारवाईमागे राजकीय हात? –जळगावमधील राजमल लखीचंदवर ईडी कारवाई मागे राजकारण असल्याच्या राजकीय क्षेत्रात चर्चा रंगू लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी खासदार ईश्‍वर बाबूजी जैन यांनी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार यांना पाठिंबा दर्शवला आहे. तर ईश्‍वर बाबूजी जैन यांचे चिरंजीव माजी विधानपरिषद आमदार मनीष जैन यांनी शरद पवार यांची साथ सोडून ते अजित पवार यांच्या पाठीशी उभी राहिले आहे. ईश्‍वर बाबूजी जैन हे दहा ते पंधरा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे संपूर्ण राज्याचे खजिनदार होते. जळगावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाची जागा ही ईश्‍वर बापुजी जैन यांच्याच नावावर आहे.

COMMENTS