मुंबई प्रतिनिधी - राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर आणि पुण्यातील मालमत्तांवर ईडीकडून शोध मोहीम राबवली जात आ
मुंबई प्रतिनिधी – राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर आणि पुण्यातील मालमत्तांवर ईडीकडून शोध मोहीम राबवली जात आहे. साखर कारखान्यातील भ्रष्टाचार प्रकरणी हा तपास केला जात असल्याचे ईडीच्या अधिकार्यांनी म्हटले आहे. आप्पासाहेब नलावडे साखर कारखाना घोटाळा प्रकरणी ही कारवाई केली जात असल्याचे समजते आहे. कोल्हापूर आणि पुण्यातील मुश्रीफांचे निवासस्थान आणि कार्यालयांत ईडीच्या अधिकार्यांकडून तपास केला जात आहे. दरम्यान, मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची धाड पडण्याची ही पहिलीच वेळ नसून या आधीही ईडीच्या अधिकार्यांनी त्यांच्या घरी धाड टाकून त्यांची चौकशीही केली होती. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात घोटाळा झाल्याचा आरोप केला होता.
सोमय्यांच्या आदेशावर ईडी चालते का?: अनिल परब
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या आदेशावर ईडी चालते आहे का असा सवाल माजी मंत्री अनिल परब यांनी उपस्थित केला आहे. सदानंद कदम यांनी ईडीला संपूर्ण सहकार्य करुनही त्यांना ईडीने समन्स दिले, ऑपरेशन झाल्याने 10 ते 15 दिवस विश्रातींची गरज आहे, असे त्यांनी ईडीला कळवले होते तरीही त्यांना ताब्यात घेऊन मुंबईला आणल्या गेले असा आरोप परब यांनी केला आहे.
COMMENTS