Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांना ईडीची नोटीस

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आली आहे. त्यांना सोमवारी 15 मे रोजी चौकशीसाठी हजर राहण्

येवल्यात नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ रस्ता रोको | LOKNews24
धनी मला ही दाखवा ना विठूरायाची पंढरी !
संगमनेरमध्ये जागतिक ग्राहक दिन उत्साहात

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आली आहे. त्यांना सोमवारी 15 मे रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जयंत पाटील यांना आयएल आणि एफएलएस प्रकरणी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयएल आणि एफएलएसच्या माध्यमातून अनेकांनी मोठा आर्थिक गैरव्यवहार केला गेला असल्याचा आरोप होता. या प्रकरणात सर्वप्रथम दिल्लीतील आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर या आर्थिक गैरव्यवहाराची व्याप्ती पाहता हे प्रकरण सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडे सोपवण्यात आले होते. याचप्रकरणी पाटील यांना नोटीस बजावत 15 मे रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले.

COMMENTS