राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची ईडीकडून चौकशी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची ईडीकडून चौकशी

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी : ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची ईडी कडून गेल्या सात तासां पासून चौकशी सुरू असल्याचे वृत्त आहे. तनपुरे यांनी कमी कि

सात नंबर अर्ज भरणार्‍या सर्व शेतकर्‍यांना पाणी द्या
राहाता : बिबटयाच्या हल्ल्याने चिमुकलीचा करून अंत
पद्मश्री पोपटराव पवार यांची राहीबाई पोपेरे यांनी बीज बँकेस दिली भेट

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी : ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची ईडी कडून गेल्या सात तासां पासून चौकशी सुरू असल्याचे वृत्त आहे. तनपुरे यांनी कमी किंमतीत साखर कारखाना खेरेदी केला होता त्या संदर्भात चौकशी केली जात असल्याचे समजते.
विदर्भातील एक साखर कारखाना राज्य सहकारी बँकेकडून बेस किमती पेक्षा कमी किंमतीत खरेदी करून तो  अहमदनगर जिल्ह्यात स्थापित केला, हा व्यवहार कसा झाला, या साठी कसे पैसे उभे केले गेले याबाबत ईडी ला असलेल्या संशयावरून ही चौकशी सुरू असल्याचे वृत्त आहे.

सदर कारखाना हा वर्ध्यातील होता अशी माहिती असून तो बेस किमतीपेक्षा कमी किमतीत खरेदी करून नगर जिल्ह्यात8वांबोरी इथे प्रसाद शुगर मिल या नावाने चार-पाच वर्षांपासून सुरू असून त्याची गाळप क्षमता वाढवण्यात आली आहे

महाराष्ट्र को-ओपरेटिव्ह बँकेने काही कारख्यान्यांना कर्ज दिली होती. त्यात महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेने विदर्भातील येथील राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखाना कर्ज प्रकरणात जप्त केला होता. या कारखान्याचा नंतर 2012 सालात लिलाव करण्यात आला होता. हा कारखाना प्राजक्त तनपुरे यांनी विकत घेतला. कारखान्याची मूळ किंमत 26 कोटी होती मात्र, हा कारखाना तनपुरे यांच्या कंपनी ने 13 कोटी रुपयांना विकत घेतला होता. या सर्व व्यवहारावर ईडीला संशय आहे.या अनुषणगाने ईडी चौकशी करत आहे. आज प्राजक्त तनपुरे यांना समन्स देऊन बोलावण्यात आपलं होतं. त्यानंतर ते चौकशीसाठी हजर झाले आहेत.गेल्या सात तासा पासुन तनपुरे यांची ईडी चौकशी करत आहे.

COMMENTS