मुंबई ः देशामध्ये लोकसभा निवडणुकीचे वातावरण ऐन उन्हाळ्यात तापले असतांना, दुसरीकडे कथित पत्राचाळ प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय र्थात ईडीने कारवाईच
मुंबई ः देशामध्ये लोकसभा निवडणुकीचे वातावरण ऐन उन्हाळ्यात तापले असतांना, दुसरीकडे कथित पत्राचाळ प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय र्थात ईडीने कारवाईचा बडगा उगारला आहे. या प्रकरणात खासदार संजय राऊत यांचे पार्टनर प्रवीण राऊत यांची तब्बल 74 कोटी रूपयांची आणखी एक मालमत्ता ईडीने जप्त केल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. सोमय्या यांनी एक्स या सोशल मीडियावर ट्विट करत संजय राऊत यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागत संजय राऊत यांना हिशोब तर द्यावाच लागेल, अशा शब्दात टीका केली आहे.
मुंबईतील पत्रा चाळ घोटाळाप्रकरणी ईडीने काही महिन्यांपूर्वी संजय राऊत यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली होती. त्यांनतर आता संजय राऊत यांचे पार्टनर प्रवीण राऊत यांची प्रॉपर्टी जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे आता या सर्व घडामोडींकडे राज्याचे लक्ष लागले आहे. ईडीने संजय राऊत यांचे पार्टनर प्रवीण राऊत यांची गोरेगाव पत्रा चाळ घोटाळ्यातील 74 कोटी रुपयांची आणखी एक प्रॉपर्टी जप्त केली आहे. पीएमसी बँकेचे 95 कोटी रुपये पत्रा चाळ एसआरएद्वारे प्रवीण राऊत यांनी स्वतःच्या व्यक्तिगत खात्यात वळवले. त्यातील कोट्यावधी रुपये संजय राऊत यांच्या खात्यात वळविण्यात आले, असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे उत्तर तर द्यावेच लागेल, असे आवाहन देखील संजय राऊत यांना किरीट सोमय्या यांनी दिले आहे. यापूर्वी या प्रकरणात, प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांच्या मालकीची 11.15 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली होती. या प्रकरणात प्रवीण राऊत यांना 95 कोटी रुपये मिळाले. याशिवाय, राकेश कुमार वाधवान आणि सारंग वाधवान यांची 31.50 कोटी रुपयांची मालमत्ता, गोवा येथे असलेल्या मालमत्ता देखील या कार्यालयाने जप्त केली होती. त्यामुळे ईडीने आतापर्यंत 116.27 कोटी रु.ची स्थावर मालमत्ता या प्रकरणात जप्त केली आहे.
COMMENTS