श्रीरामपूर : भारत सरकारच्या पर्यावरण वने आणि हवामान बदल मंत्रालयाने सुरू केलेला इको क्लब हा एक स्तुत्य आणि उपक्रमशील उपक्रम असून विद्यार्थ्यांनी
श्रीरामपूर : भारत सरकारच्या पर्यावरण वने आणि हवामान बदल मंत्रालयाने सुरू केलेला इको क्लब हा एक स्तुत्य आणि उपक्रमशील उपक्रम असून विद्यार्थ्यांनी इको क्लबच्या माध्यमातून पर्यावरणाचे संवर्धन करावे, असे प्रतिपादन डॉ. शरद दुधाट यांनी केले.
श्रीरामपूर तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या वडाळा महादेव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात नुकतीच इको क्लबची स्थापना करण्यात आली. या इको क्लबचे उद्घाटन निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण मंडळाचे राज्य संघटक डॉ. शरद दुधाट यांच्या हस्ते रोपाचे वृक्षारोपण करून संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक ज्ञानदेव माळी यांनी केले. यावेळी डॉ. दुधाट यांनी विद्यार्थी वसतिगृहासाठी केशर आंब्याची रोपे भेट म्हणून मुख्याध्यापक ज्ञानदेव माळी यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी डॉ. दुधाट यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, इको क्लब हा पर्यावरण संवर्धनासाठी निर्माण केलेला मंच असून विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी विद्यालयातून विविध उपक्रम राबवून संस्थेत आणि जिल्ह्यात आदर्श निर्माण करावा. इको क्लब ही पर्यावरण संवर्धनाची चळवळ होऊन निसर्गाला हानी पोहोचू नये यासाठी विद्यार्थ्यांनी जनजागृती करावी. यावेळी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक बाळासाहेब कसार, संतोष नेहूल, प्रशांत बांडे, अशोक पवार, संदीप जाधव, भास्कर शिंगटे, सुनीता बोरावके, उषा नाईक, शितल निंभोरे, स्वेजल रसाळ, दिपाली बच्छाव यांच्यासह स्वामी सहजानंद भारती शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे छात्रसैनिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रज्ञा कसार यांनी केले तर आभार भास्कर सदगीर यांनी व्यक्त केले.
COMMENTS