डॉ. अशोक सोनवणेअहमदनगर ः शिर्डी मतदारसंघातील खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप होतांना दिसून येत आहे. यामध्ये पंतप्रधान
डॉ. अशोक सोनवणे
अहमदनगर ः शिर्डी मतदारसंघातील खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप होतांना दिसून येत आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुडबुक मधील शेतकरी नेते अनिल घनवट आणि डॉ. भारत करडक यांनी थेट खासदार लोखंडे यांच्यावर 16 कोटींचे भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मात्र खासदार लोखंडे यांनी या आरोपांना नाकारण्याचे धाडस दाखवले नाही. त्यामुळे खासदार लोखंडेंना 16 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप अप्रत्यक्षरित्या कबुल आहे, असेच दिसून येत आहे.
16 कोटींचे भ्रष्टाचाराचे आरोप केवळ एक टोक आहे. त्यापुढे भ्रष्टाचाराचे अनेक इमले खासदार महोदयांनी बांधल्याचे दिसून येत आहे. शिवाय मतांचे धुव्रीकरण करून आपण निवडून येऊ शकतो, असा त्यांचा समज दिसून येत आहे. मराठ्यांच्या मतांशिवाय स्वतः मराठा उमेदवारही विजयी होऊ शकत नाही. शेवटी सर्वच समूहांचे मतांचे गठ्ठे असतात. वोट बँक हा शब्द उगीच निघालेला नाही. आणि म्हणून हुशार खासदार सदाशिव लोखंडे यांनी ही मराठ्यांच्या जीवावरच राजकारण केले आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. परंतु खाजगीत आणि खात्रीशीररित्या कळते की, या साहेबांची जीभ जर सटकली तर ते मराठ्यांवर खूपच आक्रमकपणे घसरतात. याचा प्रत्यय खुद्द त्यांच्याच एका मराठा विश्वासू असलेल्या पाटलांना आला असून याची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे. खासदार सदाशिव लोखंडे यांनी वळद उंबरगाव येथे बांधलेला प्रशस्त बंगला हा कोट्यावधी रुपयांचा असला तरी महाराष्ट्रामध्ये अद्वितीय आणि आगळावेगळा असा आहे. कारण हा खाजगी बंगला सरकारी खासदार निधीतून बनवण्यात आलेला आहे. राज्यसभेचे खासदार राजकुमार धूत आणि आणखी एक खासदार अशा दोन पन्नास-पन्नास लाखांच्या निधीमधून हा खाजगी बंगला बांधणारे सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अधिकारी गुजरे यांना कोणता पुरस्कार द्यावा? किती गंभीर कारवाई व्हावी. यासाठी शब्द सुचत नाहीत. इतका भयानक प्रकार आहे. लालूंच्या बिहारमध्ये त्यांच्या काळात तिकडे असले प्रकार झालेले आहेत, आणि तो प्रकार खासदार लोखंडे साहेबांनी या महाराष्ट्रात आपल्या तालुक्यात करून दाखविला आहे. त्यांचा लाडका ठेकेदार व मर्जीतला अधिकारी हे सर्व खासदारांसह पुरस्कारास पात्र नव्हेत काय? यात बांधकाम खात्याचे अधिकारीही दोषी आहेत. आमदार लहुजी कानडे यांचे जवळचे नातेवाईक असलेले उपअभियंता गुजरे यांच्या अखत्यारित खासदार निधीतून हे बंगल्याचे बांधकाम झालेले असल्यामुळे पुढारी कोणत्याही पक्षातले परस्पर विरोधक असले तरी ते वरवरच असतात. आतून फायद्यासाठी त्यांची हात मिळवणी असते. इथे हेही सिद्ध होते. कोट्यावधींच्या खासदार निधीची कल्पना आमदारांना नसावी काय? तळघर नसलेल्या या बंगल्यावर खासदार साहेबांनी सोलर प्लँट बसविला आहे, तोही स्कीमचाच असून अधिकार्यांना यावेळी अर्वाच्य भाषा वापरण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.
आपला पीए अॅडमिट का ? – आपला पीए संगमनेरला अॅडमिट होण्याचे कारण काय? खासदार लोखंडे साहेब हे स्वतः या पीएला साधे भेटायलाही का गेले नाहीत? कसल्या हिशोबावरून हे घडले. याचा हिशोब जनता मागतेय, तो जनतेसमोर मांडण्याचे धाडस दाखवा.
पनवेल ला 100 बेडच्या हॉस्पिटलचे काम खरे की खोटे?
शेवटी 9 वर्षे सेवा करणार्या अंगरक्षक मेजरला का काढले?
खेमानंद फाउंंडेशनच्या नावे 65 लाखांचे हायमॅक्स
27 कोटींचे इंटरेक्टीव्ह पॅनल्सची चौकशी करण्याचे आदेश द्याल का?
वळद उंबरगावच्या बंगल्याच्या दोन्ही दिशांना 2-2 एकर जमीन कुणाची?
प्रत्येक तालुक्यात आप्तेष्टांच्या नावे 5-5 एकर जमीन कुणाची?
COMMENTS