Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खा. शरद पवारही वारीत होणार सहभागी

मुंबई  ः आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरपर्यंत पायी वारी काढण्याची परंपरा महाराष्ट्रात दृढ आहे. याच परंपरेचा भाग शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस

राज्यात मविआला 30-35 जागा मिळतील
शरद पवारांचा राजीनामा म्हणजे घरगुती तमाशा
कोणताच धर्म चुकीच्या प्रवृत्तीचे समर्थन करत नाही

मुंबई  ः आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरपर्यंत पायी वारी काढण्याची परंपरा महाराष्ट्रात दृढ आहे. याच परंपरेचा भाग शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार हे एक दिवस पायी वारीत सहभागी होणार आहेत. पंढरपूरला जाणार्‍या आषाढी पालखी सोहळ्यात ’एक दिवस तरी वारी अनुभवावी’ हा उपक्रम राबविला जातो. यामध्ये शरद पवार एक दिवस हा अलौकीक अनुभव घेतील. अशी माहिती शामसुंदर महाराज सोन्नर यांनी दिली आहे. शरद पवार यांच्यासोबत या वारीमध्ये काँग्रसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हास पवार, जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प. बापूसाहेब महाराज देहूकर, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी हे देखील या वारीत सहभागी होणार आहेत.

COMMENTS