Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरक्षणावर खा. पवार मुख्यमंत्री शिंदे यांच्यात चर्चा

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली लढा सुरू असतांनाच दुसरीकडे ओबीसींच्या आरक्षणावर गदा येवू नये, यासाठी ओबीसी समा

द केरळ स्टोरी फेम अभिनेत्री अदा शर्मा लग्न करणार!
Ahmednagar : शहरात खळबळ… पोलीस ठाण्यातच आढळला मृतदेह
 ड्रग्स प्रकरणात आमदार खासदार हप्ते घेतात 

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली लढा सुरू असतांनाच दुसरीकडे ओबीसींच्या आरक्षणावर गदा येवू नये, यासाठी ओबीसी समाज देखील आक्रमक झाला आहे. त्यामुळे आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी काही दिवसांपूर्वी मंत्री छगन भुजळ यांनी खासदार शरद पवारांची भेट घेत त्यांनी यावर मार्ग काढण्याची मागणी केली होती. अखेर मराठा-ओबीसी आरक्षणावर सोमवारी खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानावर भेट घेतली.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावे की नाही? याबाबत शरद पवारांसह ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट कराव्यात, असे आवाहन महायुतीच्या नेत्यांनी केले होते. तसेच केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी देखील मराठा आरक्षणावरुन शरद पवार यांच्यावर टिका केली होती. या पार्श्‍वभूमीवर शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.
यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून 15 मिनिटे चर्चा झाली आहे. या चर्चेत एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांना सरकारने मराठा आरक्षणप्रश्‍नी आतापर्यंत काय प्रयत्न केले, याबाबत माहिती दिली. शरद पवार यांनी याआधी सरकार मनोज जरांगे किंवा लक्ष्मण हाके यांना काय आश्‍वासन देत आहे याबाबत विरोधी पक्षाला काहीच माहिती नसते असे बोलून दाखवले होते. त्यानंतर आता शिंदे यांनी सरकारने मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत काय काय केले आहे, याची माहिती शरद पवार यांना दिली आहे. या भेटीनंतर आता विरोधी पक्ष काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS