मुंबई ः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लिहिणे एका व्यक्तीला महागात पडले आहे. याप्रकरणी पोस्ट

मुंबई ः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लिहिणे एका व्यक्तीला महागात पडले आहे. याप्रकरणी पोस्ट लिहिणार्या व्यक्तीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी देखील या व्यक्तीविरोधात आक्रमक झाली आहे. आक्षेपार्ह पोस्ट करणार्या व्यक्तीचे नाव विशाल गोरडे असे आहे. विशालने सोशल मीडिया साईट फेसबुकवर अर्वाच्च भाषेत टीका केली होती. यानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांनी याबाबत पोलिसाता तक्रार दाखल केली होती.
COMMENTS