Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खा. शरद पवारांना झेड प्लस सुरक्षेसाठी केंद्र आग्रही

मुंबई : माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पुन्हा एकदा सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेतला असून, य

सदिच्छाच्या मृतदेहाची शोध मोहीम पोलिसांनी थांबवली
कर्मवीर व लक्ष्मी वहिनींचा प्रवास परंपरेकडून आधुनिकतेकडे ः डॉ. प्रकाश पवार
माझी मुलाखत झाल्यास राजकीय भूकंप होईल ; मुख्यमंत्री शिंदेचा उध्दव ठाकरेंना टोला

मुंबई : माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पुन्हा एकदा सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेतला असून, यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्याबाबत निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. यासाठी सुरक्षा यंत्रणा शरद पवार यांच्याशी संपर्क साधणार आहे. दरम्यान, केंद्रीय यंत्रणांनी यापूर्वीही शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा प्रदान केली होती, पण तेव्हा शरद पवारांनी सुरक्षा नाकारली होती. काही दिवसांपूर्वी बाबा सिद्दिकी यांची वांद्रे पूर्व येथे रात्रीच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या केली होती. बिश्‍नोई टोळीने या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. विधानसभा निवडणुकांच्या आधी घडलेल्या या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या घटनेमुळे केंद्रीय यंत्रणा सज्ज झाल्या असून त्यांनी राज्यातील सुरक्षेचा आढावा घेतला आहे.

COMMENTS