Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खा. इम्तियाज जलील यांच्या विरोधात शहरात निघणार मोर्चा – आमदार संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी - खा. इम्तियाज जलील हे छत्रपती संभाजीनगर नामकरणाला विरोध करत असल्याने खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात आम्ही

वाळूज औद्योगिक परिसरातील कमळापूरात भिषण गोळीबार
राजेश टोपेंमुळे कोरोना काळात तीन लाख लोकांचा मृत्यू
हिंदू मुस्लिम मध्ये दंगल घडवण्याचा भारतीय जनता पार्टी व एमआयएमचा कट – अंबादास दानवे

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – खा. इम्तियाज जलील हे छत्रपती संभाजीनगर नामकरणाला विरोध करत असल्याने खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात आम्ही मोर्चा काढणार असल्याची माहिती आमदार संजय शिरसाट यांनी दिली आहे. खा.जलील हा एमआयएम पार्टीचा राजकारण करणारा माणूस असून त्याला आमच्या परीने आम्ही रोखठोक उत्तर देऊ खासदार जलील हे करीत असलेल्या उपोषण साखळी आंदोलनात बिर्याणी पार्ट्या रंगत आहेत. अर्ध्यापेक्षा जास्त लोक क्रिमिनल आहेत अशांचा शोध घेऊन पोलीस आयुक्तांनी त्यांच्यावर कार्यवाही करावी, अशी मागणी सुद्धा आम्ही केली आहे. तसेच खा.जलील  यांच्यामुळे जर उद्योजक जगतात अशांततेचे वातावरण निर्माण होत असेल तर उद्योजकाच्या आम्ही ठामपणे पाठीशी उभे आहोत, असा खुलासाही यावेळी आमदार सिरसाट यांनी बोलताना केला. 

COMMENTS