Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भूकंप होईल.. रोगराई वाढेल.. अतिवृष्टीसह पुराचा धोका; गोदड महाराज यांच्या संवत्सरीचे भाकीत; हजारो भाविकांची उपस्थिती

कर्जत : इराण, इस्त्राईल व अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या तणावाचा परिणाम देशावर होणार असून आगामी काळात रोगराई वाढ, अतिवृष्टी, पूर, भूकंप तसेच आग लागण्याच्या घटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कर्जत येथील ग्रामदैवत संत सद्गुरु गोदड महाराज यांच्या संवत्सरीच्या भाकितात हे संकेत देण्यात आले. चैत्र पाडव्याच्या निमित्ताने हे भाकीत वाचण्यात आले असून यासाठी हजारो भाविक उपस्थित होते. सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी गोदड महाराजांनी विविध ग्रंथ, औषधे व सामाजिक, कृषी विषयक लिखाण केले आहे. त्यामध्ये ६० वर्षांची संवत्सरी लिहून ठेवण्यात आली असून दरवर्षी चैत्र पाडव्याच्या दिवशी समाधी मंदिरात त्या वर्षाचे भाकीत वाचले जाते. या भाकितावर शेतकरी आपले शेती नियोजन करत असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व आहे. यंदाच्या संवत्सराचे नाव ‘पराभव संवत्सर’ असून त्याचा स्वामी राहू-गुरु असल्याचे भाकितात नमूद करण्यात आले आहे. खरीप हंगामासाठी चांगला पाऊस अपेक्षित असला तरी काही भागांत धान्य साठवणुकीची गरज भासू शकते, असेही सूचित करण्यात आले आहे. आषाढ, श्रावण, भाद्रपद व अश्विन या महिन्यांत परिस्थिती समाधानकारक राहील आणि पावसाचे प्रमाण चांगले असेल, असेही सांगण्यात आले. मान्सून वेळेवर येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून महाराष्ट्रात मृग नक्षत्रात पावसाची सुरुवात होईल. ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस होईल, मात्र काही भागांत अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. परतीच्या पावसातही जोर राहणार असून त्या काळात पुराचा धोका वाढू शकतो. काही भागांत ओला दुष्काळ पडण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे. पावसाचे स्वरूप सर्वत्र समान नसून काही ठिकाणी खंडित पाऊस पडेल, असेही भाकितात नमूद आहे. चैत्र पाडव्याच्या निमित्ताने मंदिराचे प्रमुख मानकरी मेघनाथ पाटील यांच्या उपस्थितीत पुजारी पंढरीनाथ काकडे यांनी भाकिताचे वाचन केले. सकाळपासूनच मंदिरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. मंदिर परिसरात जागा अपुरी पडल्याने अनेक भाविकांनी बाहेर उभे राहून भाकित ऐकले. दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकरी, महिला व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भाकितावर शेतकरी शेतीचे नियोजन करतात, अशी परंपरा असून आजवर ही भाकिते अचूक ठरल्याचा भाविकांचा विश्वास आहे. दरम्यान, “गोदड महाराजांनी शेतकऱ्यांसाठी संवत्सरीच्या माध्यमातून महत्त्वाचे मार्गदर्शन केले आहे. या भाकितानुसार शेतीचे नियोजन करण्यात येते आणि आजपर्यंत हे भाकित खरे ठरले आहे,” असे मत भाविक सुरेश ख्रिस्ती यांनी व्यक्त केले.

‘भातकुडगाव’ अंतर्गत वाड्यावस्त्यांवरील वीजपुरवठा खंडित;‘रस्ता रोको’चा इशारा; दोन दिवसांत पुरवठा सुरू न झाल्यास आंदोलन
बांधकाम कामगारांचे आझाद मैदानात आंदोलन; प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक; जनशक्ती श्रमिक संघाचा पाठींबा
दूध भेसळीवर अन्न व औषध प्रशासनचे मौन; शेवगावमध्ये नागरिकांत संताप
oplus_1048576

कर्जत : इराण, इस्त्राईल व अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या तणावाचा परिणाम देशावर होणार असून आगामी काळात रोगराई वाढ, अतिवृष्टी, पूर, भूकंप तसेच आग लागण्याच्या घटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कर्जत येथील ग्रामदैवत संत सद्गुरु गोदड महाराज यांच्या संवत्सरीच्या भाकितात हे संकेत देण्यात आले. चैत्र पाडव्याच्या निमित्ताने हे भाकीत वाचण्यात आले असून यासाठी हजारो भाविक उपस्थित होते.

सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी गोदड महाराजांनी विविध ग्रंथ, औषधे व सामाजिक, कृषी विषयक लिखाण केले आहे. त्यामध्ये ६० वर्षांची संवत्सरी लिहून ठेवण्यात आली असून दरवर्षी चैत्र पाडव्याच्या दिवशी समाधी मंदिरात त्या वर्षाचे भाकीत वाचले जाते. या भाकितावर शेतकरी आपले शेती नियोजन करत असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व आहे.

यंदाच्या संवत्सराचे नाव ‘पराभव संवत्सर’ असून त्याचा स्वामी राहू-गुरु असल्याचे भाकितात नमूद करण्यात आले आहे. खरीप हंगामासाठी चांगला पाऊस अपेक्षित असला तरी काही भागांत धान्य साठवणुकीची गरज भासू शकते, असेही सूचित करण्यात आले आहे. आषाढ, श्रावण, भाद्रपद व अश्विन या महिन्यांत परिस्थिती समाधानकारक राहील आणि पावसाचे प्रमाण चांगले असेल, असेही सांगण्यात आले.

मान्सून वेळेवर येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून महाराष्ट्रात मृग नक्षत्रात पावसाची सुरुवात होईल. ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस होईल, मात्र काही भागांत अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. परतीच्या पावसातही जोर राहणार असून त्या काळात पुराचा धोका वाढू शकतो. काही भागांत ओला दुष्काळ पडण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे. पावसाचे स्वरूप सर्वत्र समान नसून काही ठिकाणी खंडित पाऊस पडेल, असेही भाकितात नमूद आहे.

चैत्र पाडव्याच्या निमित्ताने मंदिराचे प्रमुख मानकरी मेघनाथ पाटील यांच्या उपस्थितीत पुजारी पंढरीनाथ काकडे यांनी भाकिताचे वाचन केले. सकाळपासूनच मंदिरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. मंदिर परिसरात जागा अपुरी पडल्याने अनेक भाविकांनी बाहेर उभे राहून भाकित ऐकले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकरी, महिला व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भाकितावर शेतकरी शेतीचे नियोजन करतात, अशी परंपरा असून आजवर ही भाकिते अचूक ठरल्याचा भाविकांचा विश्वास आहे.

दरम्यान, “गोदड महाराजांनी शेतकऱ्यांसाठी संवत्सरीच्या माध्यमातून महत्त्वाचे मार्गदर्शन केले आहे. या भाकितानुसार शेतीचे नियोजन करण्यात येते आणि आजपर्यंत हे भाकित खरे ठरले आहे,” असे मत भाविक सुरेश ख्रिस्ती यांनी व्यक्त केले.

COMMENTS