Homeताज्या बातम्यादेश

लेह-लडाखमध्ये भूकंपाचे धक्के

लेह ः लेह लडाखमध्ये भल्या पहाटे भूकंपाच्या धक्क्यानी हादरला आहे. मंगळवारी पहाटे 5 वाजून 39 मिनिटांनी लेह-लद्दाख परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. या

छत्तीसगडमध्ये 7 मिनिटांत भूकंपाचे 2 धक्के
मराठवाडा भूकंपांच्या धक्कयाने हादरला
अफगाणिस्तान, पाकिस्तानसह नेपाळमध्येही भूकंपाचे धक्के

लेह ः लेह लडाखमध्ये भल्या पहाटे भूकंपाच्या धक्क्यानी हादरला आहे. मंगळवारी पहाटे 5 वाजून 39 मिनिटांनी लेह-लद्दाख परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.4 इतकी मोजली गेली. भूकंपाचे धक्के जाणवल्याने घाबरलेले काही लोक घराबाहेर पडले आणि उघड्यावर आले. भूकंपाचे धक्के काही सेकंदांपर्यंत जाणवले. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी किंवा कोणत्याही मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या एक्स अकाउंटवरील माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू लेह आणि लडाखमध्ये होता. भूकंचा केंद्रबिंदू जमिनीत 5 किलोमीटर खोल होता.

COMMENTS