नवी दिल्ली प्रतिनिधी - अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये रविवारी भूकंपाचे धक्के जाणवले. एक आठवड्यापूर्वी काबुलमध्ये भूकंपाची घटना ताजी असतानाच आत

नवी दिल्ली प्रतिनिधी – अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये रविवारी भूकंपाचे धक्के जाणवले. एक आठवड्यापूर्वी काबुलमध्ये भूकंपाची घटना ताजी असतानाच आता रविवारी पुन्हा काबुल शहरात भूकंप झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे अचानक जमीन हादरू लागल्याने लोकांनी जीवाच्या आकांताने घराबाहेर पळ काढला. भूकंपाचे केंद्रबिंदू पुल-ए आलम प्रांत होता. तर त्याची तिव्रता 4.2 रिश्टर स्केल इतकी असल्याची माहिती समोर आली आहे. या भूकंपाचे धक्के पाकिस्तान आणि नेपाळमधील सीमावर्ती भागांमध्ये बसले आहेत. भूकंपामुळं किती जणांचा मृत्यू झाला आहे, याची माहिती अजून समजू शकलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये काल सकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास अचानक भूकंपाचे धक्के बसले. जमीन हादरू लागल्यानं लोकांनी आहे त्या स्थितीत घराबाहेर पळ काढला. शहरातील उत्तर भागातील परिसरात इमारतीच्या ढिगार्याखाली अनेक लोक अडकून पडल्याची माहिती आहे. त्यानंतर आता प्रशासनाने मदत व बचावकार्य सुरू केले असून सकाळी भूकंप झाल्यापासून नागरिक घरात न जाता रस्त्यावर बसून वेळ काढत आहे. काही दिवसांपूर्वीच काबुलमध्ये भूकंप झाला होता. त्यानंतर आता आजही पुन्हा भूकंप झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
COMMENTS