Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के

चंद्रपूर/प्रतिनिधी ः राज्यातील गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात मंगळवारी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती समोर आले आहे. तेल

मोहम्मद फैजल यांना दुसर्‍यांदा खासदारकी बहाल
रेल्वेत नोकरीच्या आमिषाने चौघांना गंडा l Crime News | Marathi News | Railway Fraud (Video)
यवतमाळमध्ये नगरसेवकाची हत्या

चंद्रपूर/प्रतिनिधी ः राज्यातील गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात मंगळवारी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती समोर आले आहे. तेलंगणा राज्यातही काही भागांना भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. भूकंपाची तीव्रता 3.1 रिष्टर स्केल होती. जमिनीच्या 5 किमी आत हे धक्के बसल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुका तसेच गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील महागाव (बु.) येथे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती आहे.  गोदावरी फॉल्ट परिसर हा भूकंपप्रवण भाग असल्याचे सांगितले जात आहे. मंगळवार, 21 मार्च रोजी सकाळी 8.42 वाजता तेलंगणा राज्यातील कागझनगरजवळील दहेगाव भागात हे भूकंपाचे धक्के जाणवले. यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यात आणि गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील महागाव येथेही भूकंपाचे धक्के जाणवले, अशी माहिती अभ्यासकांनी दिली.

COMMENTS