Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिंगोलीत भूकंपाचे धक्के भल्या पहाटे हादरली जमीन

हिंगोली प्रतिनिधी - मराठवाड्यातील हिंगोली येथे सोमवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. 20 नोव्हेंबर रोजी पहाटे झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्ट

महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यात भूकंप  
पहाटेच्या सुमारास तीन देशांना भूंकपाचे धक्के!
मराठवाड्यासह विदर्भात भूकंपाचे सौम्य धक्के

हिंगोली प्रतिनिधी – मराठवाड्यातील हिंगोली येथे सोमवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. 20 नोव्हेंबर रोजी पहाटे झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.5 एवढी होती. दरम्यान या भूकंपात कुठलीही जीवित किंवा वित्तहाणी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाहीये. आज सोमवार पहाटे ५:०९ वाजता झाला. भूकंपानंतर लोक प्रचंड घाबरले आणि घराबाहेर पडले. एनसीएसच्या म्हणण्यानुसार हा भूकंप भूगर्भात 5 किमी खोलीवर झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) ने त्याच्या अधिकृत एक्स पोस्टमध्ये याबद्दल माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील हिंगोलीपूर्वी 19 नोव्हेंबरच्या संध्याकाळी अरबी महासागमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, रविवारी संध्याकाळी 6.36 वाजता अरबी समुद्रात झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.5 इतकी मोजली गेली. रविवारी नेपाळ आणि जम्मू-काश्मीरमधील दोडा येथेही भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळमध्ये रविवारी दुपारी 3.45 वाजता 3.9 रिश्टर स्केलचा भूकंप झाला आणि रविवारी सकाळी 11.30 वाजता जम्मू-काश्मीरच्या दोडा येथे 2.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला.

COMMENTS