Homeताज्या बातम्यादेश

अफगाणिस्तानमध्ये भूकंपाने हाहाकार

तब्बल दोन हजार नागरिकांचा मृत्यू शेकडो जमिनी जमीनदोस्त

काबूल/वृत्तसंस्था ः एकीकडे इस्त्रायलवर पॅलेस्टाईनने हल्ला सुरू केल्यामुळे एक नवे युद्ध सुरू झाले असतांना, दुसरीकडे अफगानिस्तानमध्ये पुन्हा एकदा भ

साताऱ्यात भूकंपाचे सौम्य धक्के
पहाटेच्या सुमारास तीन देशांना भूंकपाचे धक्के!
लातूर पुन्हा हादरलं, 3 दिवसात दुसऱ्यांदा भूकंपाचा धक्का

काबूल/वृत्तसंस्था ः एकीकडे इस्त्रायलवर पॅलेस्टाईनने हल्ला सुरू केल्यामुळे एक नवे युद्ध सुरू झाले असतांना, दुसरीकडे अफगानिस्तानमध्ये पुन्हा एकदा भीषण भूकंपाने पुन्हा एकदा हाहाकार माजवला आहे. तालिबान प्रवक्त्याने सांगितले की, अफगानिस्तानच्या पश्‍चिम भागात झालेल्या शक्तिशाली भूकंपात जवळपास 2 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. पश्‍चिमी अफगानिस्तानमधील इराणच्या सीमेजवळ झालेल्या या शक्तिशाली भूकंपात मोठ्या संख्येने लोक जखमी झाले आहेत. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 6.3 नोंदवली गेली.
अफगाणिस्तानमध्ये काल झालेल्या भूकंपाच्या एकामागे एक पाच धक्क्याने अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या. या भूकंपात कमीत कमी 2000 लोकांचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानमध्ये गेल्या 40 वर्षातील सर्वात मोठी आपत्ती आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.3 नोंदवली गेली. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू अफगानिस्तानमधील सर्वात मोठे शहर हेरातपासून 40 किलोमीटर नॉर्थ वेस्टमध्ये होते. या आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी जगापुढे मदतीसाठी हात पसरले आहे. भूकंप आल्यानंतर लोक घरे व दुकाने सोडून रस्त्यावर पळू लागले. सोशल मीडियावर भूकंपाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. हेरात शहरातील नागरिक बशीर यांनी सांगितले की, आम्ही ऑफिसमध्ये होतो. अचानक इमारती हलू लागल्या. भूकंप इतका भीषण होता की, भिंतीचे प्लास्टर पडू लागले तसेच भिंतींना तडे जाऊ लागले. त्याचबरोबर इमारतींचा काही भाग कोसळू लागला. त्यांनी सांगितले की, त्यांच्या कुटूंबीयांचा संपर्क तुटला आहे. मोबाइल डिसकनेक्ट झाला आहे. अफगानिस्तान राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या प्रवक्त्याने म्हटले की, ग्रामीण आणि डोंगराळ भागात भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. हेरातला अफगानिस्तानची सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते. येथे जवळपास 19 लाख लोक राहतात. मागील वर्षी जून महिन्यात झालेल्या भूकंपात येथे 1 हजार लोकांचा बळी गेला होतो. अफगानिस्तानमधील फराह आणि बदगीस प्रांतात भूकंपाचे धक्के जाणवले. अफगानिस्तानचा मोठा भाग भूकंप प्रभावित क्षेत्र आहे. हिंदुकुश पर्वत रांगेतील यूरेशियन आणि भारतीय टॅक्टोनिक प्लेटांच्या हालचालीमुळे येथे नेहमी भूकंपाचे धक्के जाणवतात. अनेक वेळा हिंदुकुशमधील भूकंपाचे धक्के दिल्लीपर्यंत जाणवतात. या भूकंपामुळे प्रचंड हानी झाली आहे.

COMMENTS