Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ई-कचरा संकलन अभियान वर्षभर राबविणार

पुणे/प्रतिनिधी ः चिंचवड शहरात वर्षभर ई-कचरा संकलन अभियान राबविण्यात येणार आहे. घातक कचरा संकलित करून त्याचा पुनर्वापर व शास्त्रीय पद्धतीने विल्हे

सिव्हील जळीतकांडाच्या तपासात दाखवावा लागला पोलिसी खाक्या
‘त्या’ दिवसांत नवऱ्याची साथ महत्वाची : प्रिया बापट
अतिवृष्टीतून धडा घेतला नाही तर….!

पुणे/प्रतिनिधी ः चिंचवड शहरात वर्षभर ई-कचरा संकलन अभियान राबविण्यात येणार आहे. घातक कचरा संकलित करून त्याचा पुनर्वापर व शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. महापालिकेच्या भोसरीतील ई-वेस्ट सेंटर येथे ई-कचरा संकलन व्हॅनच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, माहिती व जनसंपर्क विभागप्रमुख रविकिरण घोडके, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, ईसीएच्या विनिता दाते, डॉ. आशा राव, नताशा गांगल, हिरामण भुजबळ यांच्यासह ग्रीनस्केपचे प्रमुख रुपेश कदम उपस्थित होते. महापालिका, ग्रीन स्केप आणि ईसीए यांच्या संयुक्त विद्यमाने ई-वेस्ट रिसायकलिंग, प्लास्टिक रिसायकलिंग कम हॅबी सेंटरच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. या उपक्रमाची रूपरेषा आयुक्त सिंह यांनी समजावून घेत सूचना केल्या. त्याची अंमलबजावणी करून लवकरच संपूर्ण शहरात वर्षभर कायमस्वरुपी ई-कचरा संकलन अभियान राबवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

COMMENTS