Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पीएम किसान योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी पूर्ण करावी

कर्जतचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांचे शेतकर्‍यांना आवाहन

कर्जत/प्रतिनिधी ः प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी करण्यात आलेल्या सर्व पात्र शेतकर्‍यांनी लाभाचे हप्ते सुरळीत बँक खात्यात जमा

कर्जत तालुक्यातील 40 बचत गटांना खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते दोन कोटी रुपयांचे साहित्य व कर्ज वाटप  
बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या तालुकध्यक्षपदी शरद खरात
नगर- दौंड रोडवरील हॉटेल राजयोग येथे नगर तालुका पोलिसांचा वेश्या व्यवसायावर छापा

कर्जत/प्रतिनिधी ः प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी करण्यात आलेल्या सर्व पात्र शेतकर्‍यांनी लाभाचे हप्ते सुरळीत बँक खात्यात जमा होण्याकरीता त्यांचे बँक खाते इ- केवायसी करणे बंधनकारक आहे. कर्जत तालुक्यात एकूण लाभार्थींची संख्या 48689 एवढी आहे. त्यातील 9443 लाभार्थ्यांनी इ- केवायसी पूर्ण केलेली नाही. त्यामुळे त्यांच्या खात्यात निधी वर्ग केला जात नाही. अशा लाभार्थ्यांनी नजीकच्या सीएससी, महाऑनलाईन सेंटर येथे जावून इ- केवायसी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन कर्जतचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी केले आहे. याबाबत माहिती देताना नायब तहसीलदार सुरेश वाघचौरे म्हणाले, इ- केवायसी पूर्ण न केलेल्या लाभार्थ्यांच्या याद्या कर्जत तालुक्यातील सर्व तलाठ्यांकडे देण्यात आलेल्या आहे. या याद्या वंचित असलेल्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत. इ- केवायसी राहिलेल्या लाभार्थ्यांनी आधारकार्ड व योजनेसाठी दिलेला मोबाईल क्रमांक (ओटीपी मिळवण्यासाठी) घेवून नजीकच्या सीएससी, महाऑनलाईन सेंटर येथे जावून इ- केवायसी पूर्ण करून घ्यावी.

COMMENTS