शिर्डी/प्रतिनिधी ः राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती ज्ञानेश्वर गंगाधर गोंदकर यांची तर उपसभापती आण्णासाहेब भाऊसाहेब कडू यांची बिनविरोध
शिर्डी/प्रतिनिधी ः राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती ज्ञानेश्वर गंगाधर गोंदकर यांची तर उपसभापती आण्णासाहेब भाऊसाहेब कडू यांची बिनविरोध झाली आहे. या बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच होवुन विखे पाटील यांच्या एकहाती सत्ता सभासदांनी दिली आहे. सहाय्यक निवडणूक आता निवडणूक निर्णय अधिकारी रावसाहेब खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली नुतन संचालक मंडळाची सभापती व उपसभापती निवडीसाठी बैठक झाली. यावेळी निवडणूक प्रकिया पार पडली. सभापती पदासाठी ज्ञानेश्वर गोंदकर तर उपसभापती पदासाठी अण्णासाहेब कडू यांचे दोघांचे अर्ज आल्याने दोघांची निवड बिनविरोध करण्यात आल्याचे घोषित करण्यात आले.
यावेळी नूतन संचालक मंडळातील सदस्य ज्ञानेश्वर गोंदकर, आण्णासाहेब कडू, विजय कातोरे, संतोष गोर्डे, दत्तात्रय गोरे, ज्ञानदेव चौधरी, बाबासाहेब शिरसाठ, मिना निर्मळ, रंजना लहारे, दिलीप गाडेकर, राजेंद्र धुमसे, जालिंदर गाढवे, राहुल धावणे, सुभाष गायकवाड, शांताराम जपे, सचिन कानकाटे, निलेश बावके,बाबासाहेब कांदळकर सचिव उध्दव देवकर, विखे पाटील यांचे स्विय सहायक प्रमोद राहाणे अदिसहअदि उपस्थित होते. निवडीनंतर सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, व उपसभापती आण्णासाहेब कडू यांचा सहाय्यक निवडणूक अधिकारी खेडकर यांनी सत्कार करण्यात आला. तर सर्व संचालक मंडळाचा माजी संचालक व उपस्थित मान्यवरांनी सत्कार केला. याप्रसंगी गणेशचे उपाध्यक्ष प्रतापराव जगताप, संचालक मधुकर कोते, माजी संचालक दिगंंबर कोते, शिवाजी गोंदकर, माजी उपसभापती वाल्मिकराव गोर्डे, माजी संचालक किरण दंडवते, चंद्रकांत बावके,ओमेश जपे,कानिफ बावके, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष सतीश बावके, अस्तगावचे माजी सरपंच नंदकुमार गव्हाणे, नवनाथ नळे, ज्ञानदेव गोर्डे, राजेंद्र पठारे, सागर गोर्डे, राजेंद्र तांबे, विजय गोंदकर, विलास रोहोम, बापुसाहेंब लहारे, भिमराज निर्मळ, गोपिनाथ गोंदकर, राजेंद्र कोल्हे, यांचेसह कार्यकर्त्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते. ना. विखे पाटील यांचे स्विय सहायक प्रमोद राहाणे सचिव उद्धव देवकर यांनी ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडल्याबद्दल संचालक मंडळाचे तसेच निवडणूक निर्णय अधिकारी खेडकर यांचे व त्यांच्या सहकार्यांचे ना. विखे पाटील व खा.डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वतीने सर्वांचे आभार मानले.
COMMENTS