Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्ञान, अनुभव व मानसिक स्वास्थ्य यांच्या समन्वयाने कर्तव्य पार पाडावे – संजय कुमार

महाराष्ट्र पोलीस अकॅडमीत दीक्षांत संचलन कार्यक्रम संपन्न

नाशिक - अधिकारी म्हणून निर्णय घेतांना ज्ञान, अनुभव व मानसिक स्वाथ्य यांच्या समन्वयाने निर्णय घेवून कर्तव्य पार पाडावीत, असे प्रतिपादन सेवानिवृत्

अध्यक्षांच्या अधिकारावर न्यायालयीन आक्रमण?!
श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे निधन; सातारा शहरावर दु:खाचा डोंगर
महानगरपालिकेवर काँग्रेसचा भव्य आसूड मोर्चा

नाशिक – अधिकारी म्हणून निर्णय घेतांना ज्ञान, अनुभव व मानसिक स्वाथ्य यांच्या समन्वयाने निर्णय घेवून कर्तव्य पार पाडावीत, असे प्रतिपादन सेवानिवृत्त पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) तथा राज्य मानवी हक्क आयोगाचे सदस्य संजय कुमार यांनी केले.

महाराष्ट्र पोलीस अकॅडमी येथील मुख्य कवायत मैदान येथे प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्र 123 च्या दीक्षांत संचलन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) राजकुमार व्हटकर, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेश कुमार, उपसंचालक (सेवांतर्गत प्रशिक्षण) अनिता पाटील, विशाल गायकवाड, सचिन गारे, प्रदीप जाधव यांच्यासह महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार व प्रशिक्षणार्थींचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सेवानिवृत्त पोलीस महासंचालक संजय कुमार प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले, या ठिकाणी देण्यात आलेल्या प्रशिक्षणाचा योग्य वापर समाजहितासाठी करण्यात यावा. सायबर क्षेत्रात वाढत असणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सजगतेने काम करावे, तसेच येणाऱ्या निवडणूकांमध्ये चांगले काम करून आपल्या कामाचा ठसा उमटवावा. शारीरिक स्वास्थ्य हिच खरी संपत्ती आहे हे लक्षात ठेवून मेहनतीने आपली कर्तव्ये पार पाडावीत, असे ही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी महाराष्ट्र प्रबोधिनीचे संचालक राजेश कुमार यांनी सर्व प्रशिक्षणार्थींना पद व गोपनीयतेची शपथ दिली. तसेच अहवाल वाचन केले.

*हे आहेत विशेष प्राविण्य प्राप्त प्रशिक्षणार्थी….*

सलमान जाहेर शेख – मानाची रिव्हॉल्वर व बेस्ट ट्रेनी ऑफ द बॅच,

मिना केशवराव झाडे – सर्वोत्कृष्ट महिला प्रशिक्षणार्थी,

दिपक सयाजी रहाणे – द्वितीय सर्वोत्कृष्ट  प्रशिक्षणार्थी,

कवायत सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी – संतोष नारायण कोळगे,

कायदा अभ्यासक्रम सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी – अंकुश विठ्ठल दुधाळ,

गोळीबार सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी – रामचंद्र किसन बहुरे, 

बाह्यवर्ग सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी – निलेश विठ्ठल तळेकर

COMMENTS