इस्लामपूर : सकल हिंदू समाजातर्फे आयोजित शोभा यात्रेच्या प्रारंभ प्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील व मान्यवर. इस्लामपूर : शोभा यात
इस्लामपूर / प्रतिनिधी : अयोध्येतील राम मंदिरात आज सोमवार, दि. 22 जानेवारी रोजी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर इस्लामपूर शहरात सकल हिंदू समाजाच्यावतीने रविवारी दुपारी चार वाजता शोभा यात्रा काढण्यात आली. रथात सात फुटी श्रीराम मूर्ती, महाबली हनुमान यासह अनेक चित्ररथ, श्रीराम वेशातील बालक, हत्ती, घोडे, ढोल-ताशा पथक, टाळ-मुर्दूग, हलगी, दांड पट्टा, डोकीवर कलश घेतलेल्या महिला, विविध वेशभूषा केलेले युवक-युवती व हजारो रामभक्त या शोभा यात्रेत सहभागी झाले होते. जय श्रीरामचा जयघोषाने संपूर्ण इस्लामपूर शहर राममय व भक्तिमय बनले होते.
अयोध्येतील राम मंदिरात आज सोमवार, दि. 22 जानेवारी रोजी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहात पार पडत आहे. यामुळे देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर इस्लामपूर शहरातही सकल हिंदू समाजाच्यावतीने शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी चार वाजता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या शोभायात्रेस भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, माजी आमदार भगवानराव सांळुखे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, बाबासाहेब मंत्री, माजी नगरसेवक एल. एन. शहा, विक्रम पाटील यांच्यासह हिंदू समाजाचे पदाधिकारी यांच्या हस्ते प्रारंभ झाला.
यावेळी पारंपरिक वाद्यांचा गजर करण्यात आला. रथात सात फुटी श्रीराम मूर्ती, महाबली हनुमान यासह अनेक चित्ररथ, श्रीराम वेशातील बालक, हत्ती, घोडे, ढोल-ताशा पथक, हलगी, दांड पट्टा, टाळ-मुर्दूग, बँड पथक, डोकीवर कलश घेऊन महिला, विविध वेशभूषा केलेले युवक-युवती व हजारो नागरिक या शोभा यात्रेत सहभागी झाले होते. महावीर चौक, गांधी चौक, संभाजी चौक, ब्राह्मणपुरी, गणेश मंडई पुन्हा गांधी चौक, यल्लामा चौक या शहरातील मुख्य मार्गावरून शोभा यात्रा निघून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे यात्रेची सांगता झाली. दरम्यान, विविध चौकात तसेच विविध समाजातर्फे या शोभा यात्रेचे जागोजागी जंगी स्वागत करण्यात आले. जय श्री रामचा जयघोषाने संपूर्ण इस्लामपूर शहर राममय व भक्तीमय झाले होते. त्यामुळे संपूर्ण वातावरण ढवळून निघाले होते.
यावेळी आनंदराव मलगुंडे, सुभाष शिंगण, मंगल शिंगण, भास्कर कदम, अमित ओसवाल, प्रदीप लोहार, संजय भागवत, राजेश मंत्री, भाजपा जिल्हा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा आशाताई पवार, भाजपाचे जिल्हा चिटणीस धैर्यशील मोरे, उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, वाळवा तालुका भाजपाचे अध्यक्ष निवास पाटील, भाजपा ओबीसी सेलचे अध्यक्ष मधुकर हुबाले, सरचिटणीस संदीप सावंत, दादासाहेब रसाळ,प्रमोद डांगे, भाजपा शहर अध्यक्ष अशोकराव खोत, भाजपा महिला मोर्चाच्या शहरध्यक्षा सुनीता काळे, संजय पोरवाल, भास्कर मोरे, अजित पाटील, अक्षय पाटील, प्रवीण परिट, संदीपराज पवार, गजानन फल्ले, संजय हलवदार, डॉ. प्रमोद कदम, मानसिंग पाटील, अमित कदम, येडेमच्छिंद्रचे माजी सरपंच गणेश हराळे, अर्जुन खरात, शरद पाटील, रावसाहेब पाटील, राहुल खराडे, विश्वजीत पाटील, आनंदराव पाटील, धनाजी पाटील, अक्षय कोळेकर आदींसह शहरातील महिला वर्ग, सर्व धर्मातील रामभक्त, युवक, युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सर्वधर्मीयांच्यावतीने चौका-चौकात जंगी स्वागत
इस्लामपूर शहरात सकल हिंदू समाजाच्यावतीने काढण्यात आलेल्या शोभा यात्रेचे शहरातील चौक-चौकात सर्व धर्मीयांच्यावतीने जंगी स्वागत करण्यात आले. तसेच शहरातील प्रमुख मार्गावर व प्रत्येक घरासमोर रांगोळी रेखाटण्यात आल्या होत्या. रथात असलेल्या श्रीरामाच्या मूर्तीचे जागोजागी महिलांनी औक्षण केले.
हत्ती, महाबली हनुमान ठरले सर्वांचे आकर्षण
शोभा यात्रेत हत्ती, महाबली हनुमान, मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके, नेत्रदीपक आतिषबाजी, अंध मुलांनी गायलेली श्रीराम भक्ती गीते ही सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
बालचमुंचाही उत्स्फूर्त सहभाग
शोभा यात्रेत श्रीरामाची वेशभूषा करून अनेक बालचमू सहभागी झाले होते. त्यांना सजवलेली ट्रॅक्टरमध्ये उभे केले होते. ते सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
COMMENTS