नाशिक प्रतिनिधी - युगानुयुगे ज्यांच्या किर्तीची पताका सर्वदूर फडकत राहिली आहे, अशा वीरधुरंधर, धर्मसहिष्णू, प्रजाहितदक्ष, गोप्रतिपालक, राजकारण
नाशिक प्रतिनिधी – युगानुयुगे ज्यांच्या किर्तीची पताका सर्वदूर फडकत राहिली आहे, अशा वीरधुरंधर, धर्मसहिष्णू, प्रजाहितदक्ष, गोप्रतिपालक, राजकारण धुरीण, एकमेवाद्वितीय आदर्श जाणता राजा श्री शिवछत्रपती महाराज यांच्या जयंतीनिमित्त मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था नाशिक संचलित धनलक्ष्मी शाळेत शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मानवधन संस्थेचे संस्थापक प्रकाश कोल्हे, सचिव तथा मुख्याध्यापिका ज्योती कोल्हे,पूनम पाटील,विठ्ठल जाधव,गया पानसरे, योगिता तांबे उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत ज्योती कोल्हे यांनी सांगितले की, श्री शिवछत्रपती एक व्यक्ती नसून ते एक विचार आहेत, तत्त्व आहेत. माणूस म्हणून जगताना देवत्वाच्या स्थानापर्यंत पोहोचलेले ते महापुरुष आहेत. आपण त्यांचा आदर्श घ्यावा. प्रकाश कोल्हे यांनी मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, शिवरायांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग हा जीवनपाठ आहे. काळ-वेळ सापेक्ष नीती मुल्यांची बीजे त्यांनी या मराठी मातीत रुजवली. प्रत्येक व्यक्तीला ‘स्वराज्य’ बहाल करणार्या या कल्याणकारी राजाने खरोखर लोकशाहीची पायाभरणी केली. केवळ त्यांची पूजा करून न थांबता त्यांच्या थोर विचारांना, तत्वांना अंगीकारले पाहिजे. प्रत्येक पिढीने त्यांच्या आदर्श गुणांचा जीवनपाठ नित्य स्मरला पाहिजे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा कुलकर्णी यांनी केले. यावेळी सर्व शिक्षकवृंद व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
COMMENTS