Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सफाई कामगारांच्या तुटवड्यामुळे नागरिकांनाच करावी लागते रस्त्याची स्वच्छता

नवी मुंबई प्रतिनिधी - नवी मुंबई महानगरपालिकेला चार दिवसांपूर्वी राज्य सरकार कडून स्वच्छ शहर म्हणून पुरस्कार मिळाला. मात्र सत्य परिस्थिती का

पैसे खाल्ल्याच्या आरोपाने संचालक व चेअरमनमध्ये वाद ; नगर अर्बन बँकेची अब्रू चव्हाट्यावर
विद्यार्थ्यांचे कोविड काळातील शैक्षणिक नुकसान भरून काढा
युवा सेनेच्या राज्य सहसचिवपदी विक्रम अनिलभैय्या राठोड यांची नियुक्ती

नवी मुंबई प्रतिनिधी – नवी मुंबई महानगरपालिकेला चार दिवसांपूर्वी राज्य सरकार कडून स्वच्छ शहर म्हणून पुरस्कार मिळाला. मात्र सत्य परिस्थिती काही वेगळीच आहे.याच पालिकेच्या तुर्भे परिसरात सेक्टर 21 अलखनाथ शाळा ते आयसियल शाळे पर्यंत संपूर्ण फुटपाथवर कचऱ्याचे साम्राज्य पसरले असल्याचे चित्र आहे. मागील 20 दिवसांपासून या ठिकाणी पालिकेचा कुणीही सफाई कर्मचारी सफाई करण्यासाठी आला नसल्याचे येथील दुकानदार सांगत आहेत. आम्हीच या ठिकाणी झाडू मारून हे परिसर स्वच्छ करत असल्याचे सांगून, आम्ही काही ओळखीच्या सफाई कर्मचाऱ्यांना विचारले असता कर्मचारी कमी असल्याने येऊ शकत नसल्याचे अजब उत्तर मिळाले. येथील दुकानदार सांगत आहेत. जर कर्मचारी कमी आहेत, मग पालिका साफ सफाई वर करोडोंची खर्च कुठे आणि कुणावर करत आहे? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे साफ सफाईच्या नावावर करोडो रुपयांचा चुराडा करणारी पालिका फक्त मोजक्या आणि प्रदर्षनीच ठिकाणी साफ सफाईचा दिखावा करून सरकार आणि राज्य सरकारची फसवणूक करत आहे.

COMMENTS