Homeताज्या बातम्याशहरं

शॉर्टसर्किटमुळे सरताळे येथे साडेचार एकर क्षेत्रावरील ऊस जळला

सरताळे : विजेच्या शॉर्टसर्किटमुळे जळालेल्या ऊसाच्या पिकाचे क्षेत्र. कुडाळ / प्रतिनिधी : जावळी तालुक्यातील सरताळे येथील शेतकरी सुनील महादेव नवले, प

“त्या” कुलसचिव पदाच्या खुर्चीत दडलंय काय?
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत न दिल्यास आंदोलन छेडणार
Beed : महावितरणचा गलथान कारभार तार तुटून दोन एकर ऊस जळुन खाक ! (Video)

कुडाळ / प्रतिनिधी : जावळी तालुक्यातील सरताळे येथील शेतकरी सुनील महादेव नवले, प्रदीप खंडू नवले, बबन धर्माजी नवले, अरुण आनंदराव नवले, बाळासाहेब धर्माजी नवले यांच्या सुमारे साडेचार एकर क्षेत्रावरील ऊस वीज तारांचे घर्षण होऊन शॉर्टसर्किट होवून लागलेल्या आगीत जळून खाक झाला आहे. यात शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. उसाला आग लागताच शेतकर्‍यांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण आगीने उग्र रूप धारण केल्याने शेतकर्‍याचे प्रयत्न विफल झाले. यात टोमॅटोच्या मोकळ्या वीस कॅरेट जळून खाक झाली आहेत.
ऊस जळून खाक झाल्याने लाखों रूपयांचे नुकसान झाले आहे. आधीच अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे खूप नुकसान झाल्याने शेतकर्‍यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे.गावकामगार तलाठी एन.जी. फडतरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. महावितरणचे अधिकारी राठोड यांनीही याठिकणी भेट दिली.जळीत झालेल्या ऊसाची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी केली आहे.

COMMENTS