Homeताज्या बातम्यादेश

राजकीय वैमनस्यातून नराधमांनी आख्ख्या कुटुंबाला संपवलं  

आरोपींनी जिल्हा परिषद सदस्यासह त्याची आई आणि पत्नीवर गोळीबार केला या गोळीबारानंतर आरोपी दुचाकीने पळून गेले

उत्तर प्रदेश प्रतिनिधी  - समाजवादी पक्षाचे नेता आणि जिल्हा परिषद सदस्य राकेश गुप्ता(Rakesh Gupta) यांच्या  घरात काही नराधमांनी गोळीबार केल्याची

केरळमधून सोलापुरात स्थायिक झालेल्या पापडी विक्रेत्याचा खून
पुण्यात सिंहगड रोडवर फळविक्रेत्याची हत्या
धक्कादायक ! आईने मुकबधीर मुलीला चौथ्या मजल्यावरून फेकले.

उत्तर प्रदेश प्रतिनिधी  – समाजवादी पक्षाचे नेता आणि जिल्हा परिषद सदस्य राकेश गुप्ता(Rakesh Gupta) यांच्या  घरात काही नराधमांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी जिल्हा परिषद सदस्यासह त्याची आई आणि पत्नीवर गोळीबार केला. या गोळीबारानंतर आरोपी दुचाकीने पळून गेले. संबंधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले.पोलिसांनी तीनही मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलिसांच्या माहितीनुसार राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत. संबंधित घटना ही उत्तर प्रदेशच्या बदायू येथील सथरा गावात घडली आहे.

COMMENTS