Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वनविभागाच्या आडमुठेपणामुळे फुकेवाडी ग्रामस्थांचा रस्त्याचा प्रश्न प्रलंबित

बीड प्रतिनिधी - बीड तालुक्यातील फुकेवाडी येथील ग्रामस्थांना डोंगराळ भागातुन रस्त्याची अडचण मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत तब्बल पावणे दोन कोटी

पंजाब किंग्जच्या विजयामुळे प्लेऑफसाठी चुरस वाढली
जामखेडच्या राजकारणात धक्कातंत्र ;
दैव बलवत्तर म्हणून प्रवाशांचे प्राण वाचले l पहा LokNews24

बीड प्रतिनिधी – बीड तालुक्यातील फुकेवाडी येथील ग्रामस्थांना डोंगराळ भागातुन रस्त्याची अडचण मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत तब्बल पावणे दोन कोटी रुपये खर्चून तयार होत असतानाच वनविभागातील आधिका-यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे रस्ता प्रलंबित राहीला असुन वनविभागाने रस्ता अडवल्याने कंत्राटदार पेचात पडले मात्र यामध्ये फुकेवाडी करांचे हाल होत असुन ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
बीड तालुक्यातील पिंपरनई ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत फुकेवाडी हे बालाघाटाच्या डोंगर द-यात वसलेले गाव 35 -40 घरं असणा-या बहुतांश ग्रामस्थ ऊसतोड मजूर, डोंगरदर्‍यातील सिताफळ,लिंबु आदि रानमेवा विकुन पोट भरणारी.यांना बाजारहाट , दवाखाना,शाळा आदिंसाठी अडीच किलोमीटर डोंगर चढून 8 किलोमीटर अंतरावर लिंबागणेश याठिकाणी जावं लागतं.देशाला स्वातंत्र्य मिळुन 73 वर्षें होऊन सुद्धा शासनाची बस न पाहिलेलं बीड शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेले गाव.1974 पासुन याठिकाणी 4 थी पर्यंत जिल्हा परीषद शाळा आहे.बापजाद्यापासुन याठिकाणी वास्तव्य करणार्‍या ग्रामस्थांना 2009 साली शासकीय निधीतून कच्चा रस्ता करण्यात आला होता.मात्र मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत इजिमा 115 ते फुकेवाडी रस्ता सुधारणासाठी या अडीच किलोमीटर डोंगराळ भागातील रस्त्यांसाठी 168.77 लक्ष रुपये निधी मंजूर होऊन डी.बी.कनस्ट्रक्शन मार्फत रस्ता कामाला सुरुवात झाली आहे.मात्र वनविभागाच्या जागेतुन हा रस्ता जात असल्याने वनविभागाच्या अधिकार्‍यांनी रस्ता अडवला आहे त्यामुळे कंत्राटदार यांनी रस्त्याचे काम थांबवले आहे त्यामुळे रस्ता पुर्ण होणार की नाही यामुळे ग्रामस्थ चिंताग्रस्त आहेत. फुकेवाडी गाव 70 वर्षांपासून त्याठिकाणी वसलेले असुन ग्रामस्थ याच रस्त्याने ये जा करतात . गेल्या 15 वर्षात वनविभागाच्या ताब्यात डोंगराळ भाग आलेला आहे.तसेच यापूर्वीही शासनाच्या निधीतून याठिकाणी कच्चा रस्ता झालेला आहे त्यामुळे शासनाचे पावणे दोन कोटी रुपये खर्चून होणा-या रस्तेकाम अडवण्याची वधविभागाची भुमिका आडमुठेपणाची अन्याय कारक असुन यासाठी लवकरच आंदोलन उभारण्याचा ग्रामस्थांचा मानस आहे.त्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार.

COMMENTS