सातारा / प्रतिनिधी : गेले सोळा दिवस चालू असलेल्या एसटी कर्मचार्यांच्या आंदोलनाला आता वेगळे वळण लागले आहे. राज्य सरकारने एसटी संपावर तोडगा काढण्य

सातारा / प्रतिनिधी : गेले सोळा दिवस चालू असलेल्या एसटी कर्मचार्यांच्या आंदोलनाला आता वेगळे वळण लागले आहे. राज्य सरकारने एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी कर्मचार्यांना वेतनवाढ देण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर आणि शेतकरी नेते आ. सदाभाऊ खोत यांनी या संपातून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. यावर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यावर खरमरीत टिका केली आहे.
ते म्हणाले, शेतकरी चळवळ आणि कामगारांची चळवळ वेगळी असते. एसटीचे आंदोलन आणि शेतकर्यांचे आंदोलन वेगळे असते. याचा गृहपाठ न केल्यामुळे पडळकर आणि खोत यांना तोंडघशी पडावे लागले, अशी खोचक टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली.
आपण ज्यांचे नेतृत्त्व केले त्यांच्या अपेक्षा भरपूर वाढून ठेवल्या आणि त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. मग शेवटी चळवळ म्हणजे एक प्रकारचा वाघच आहे. वाघावर स्वार होणे सोपे असते. पण, एकदा स्वार होऊन परत पायउतार होणे अवघड असते. अन्यथा वाघ चिडला, तर मग वाघाने ज्याला आपल्यावर स्वार केलेले असते. त्याला तो खाऊ टाकायला मागे-पुढे बघत नाही, असे सांगत राजू शेट्टी यांनी पडळकर आणि खोतांवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, अनिल परब म्हणाले, अनिल परब यांनी कर्मचार्यांना कामावर परत येण्याचे आवाहन केले आहे. मात्र, कर्मचारी विलगीकरणाच्या मुद्यावर ठाम आहेत. न्यायालयाने संप बेकायदेशीर ठरवला तर एक दिवसाला 8 दिवसांची पगारकपात केली जाईल. कर्मचार्यांचे आर्थिक नुकसान करायचे नाहीय. जे कर्मचारी कामावर येतील त्यांना संरक्षण दिले जाईल.
COMMENTS