Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नजर कमी झाल्याने बालकांच्या डोळ्यांत येऊ शकतो तिरळेपणा!

लातूर प्रतिनिधी - मुलांचे वय वाढू लागले की, त्यांच्यातील जन्मजात असलेले व्यंगही दिसू लागतात. त्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांकडे धावाधाव सुरु होते. मात्र

शेतकऱ्यांनी स्वावलंबी होण्यासाठी स्वयंचलीत तंत्रज्ञानाचा वापर करवा- कुलगुरू पाटील
राहुरी विद्यापीठाच्या हरभरा वाणांची मोठ्या प्रमाणात लागवड
सज्जनगडावरील समाधी मंदिर विद्युत रोषणाईने उजळले

लातूर प्रतिनिधी – मुलांचे वय वाढू लागले की, त्यांच्यातील जन्मजात असलेले व्यंगही दिसू लागतात. त्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांकडे धावाधाव सुरु होते. मात्र, पालकांनी वेळीच लक्ष देऊन उपचार घेतल्यास या समस्येवर मात करता येऊ शकते. दरम्यान, जिल्ह्यात चार महिन्यांत अंगणवाडी व शाळांमध्ये केलेल्या आरोग्य तपासणीत 45 बालकांत तिरळेपणा आढळून आला आहे. त्यातील 22 मुलांवर शस्त्रक्रिया करुनच तिरळेपणा दूर करावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शासनाच्या वतीने सन 2013 पासून राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत 0 ते 18 वयोगटातील बालक, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येते. या तपासणीसाठी जिल्ह्यात एकूण 30 वैद्यकीय पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉक्टरांकडून अंगणवाडीतील बालकांची वर्षातून दोनदा तर शालेय विद्यार्थ्यांची वर्षातून एकदा तपासणी करण्यात येते. एप्रिल ते जुलैअखेर या कालावधीत जिल्ह्यातील 2587 अंगणवाड्यातील 1 लाख 60 हजार 456 बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच जुलैमध्ये 68 हजार 968 शालेय विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. त्यात तिरळेपणाची लक्षणे असलेली 45 मुले आढळून आली आहेत. ही तपासणी तत्कालिन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, नेत्र शल्यचिकित्सक डॉ. श्रीधर पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यक्रम समन्वयक अमोल झेंडे व त्यांच्या पथकाने पार पाडली.

COMMENTS